जांभई थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा चेहरा आक्रसला. 
‘डोळ्याखाली काळी वर्तुळ पाहिलीस कां ? जरा वेळेत झोपत जा! 
रात्र-रात्र जागून game खेळत बसतोस…’ 
आईचा आवाज कानात घुमला त्याच्या. 
‘बस! ही एक level खेळली की झोपतो’ तो म्हणे आणि
मान वेळावून आई निघून जाई. तिला खात्री असे की 
सकाळ होईतोवर हा काही झोपणार नाही.
——————————————————
त्या night riderची काय दुष्मनी आहे माझ्याशी god knows ! 
Such a freak he is ! मी दिसलो की दार उघडून 
लाथ फिरवतोच साला हवेत. Damn it ! आज तू उघड रे दार, 
कसा तुला कट मारून जातो ते बघच ! एक मात्र खर. 
हा game online खेळायला जास्त मजा येते, 
demoमध्ये सगळे साले डमी प्लेयर; तिथे काय कुणीही येत 
आणि जिंकत. Car racingच्या खेळात focus पाहिजे. 
आणि कमीत-कमी दोन beer हव्यातच. 
मग खेळताना काय नशा येते म्हणून सांगू. हां ! 
पण फक्त दोन. नाही तर focus जातो. Control control! 
तो फार महत्वाचा. मागे एकदा दोनाच्या चार झाल्या तर 
गेल की कुणीतरी ढकलून. साला lead position 
वरून डायरेक्ट सातवर ? आज मात्र beer घेण शक्य नाही. 
आज interviewला जायचय.
—————————————————-
ही लोकं लाईनमध्ये कां उभी रहात नाहीत ? 
अशी अस्ताव्यस्त कां थांबतात स्टॉपवर ? कां सवयचं लागल्ये तशी? 
यायचं आणि रहायचं उभं कसही. कुठेही. बस आली की एकदम 
सगळे धावणार; कुणी पडतय, लटकत बस पकडतय. 
शिस्त नाही. त्यात पाऊस येतोय, म्हणजे सगळीकडे चिकचिक.     
 
न्यूटनला काय होतय सिद्धांत मांडायला. 
म्हणे what goes up must come down ! 
हिचे स्तन अपवाद आहेत रे बाबा. ते तर gravityला 
challenge करतात. वर गेले की हवेत स्थिर राहतात. 
What magnets! च्यायला ! बस चुकली माझी दोनदा. 
चुडीदारमध्येच असते नेहेमी पण ओढणी तरी नीट घ्यावी 
तर ती मात्र गळयाभोवती. 
जे झाकायचं ते उघड आणि नको ते बंद.
          
हा आला Nepolean bone apart! 
जागोजागी हाडांचे सुळके वर आलेत. 
आणि टी-शर्ट वर लिहिलय ‘बघतोस काय मुजरा कर’. 
अरे हडकुळ्या पेहेलवाना! तुला बघून सापळासुद्धां लाजेल. 
आज पुन्हां टी-शर्ट आणि वर लिहिलय 
DON’T MESS WITH ME. अरे माझ्या कर्मा! 
तुझ्याशी कोण पंगा घेणार? चुकून लागलं तरी तू बेशुद्ध पडणार.
 
हिरवं पान आलं. साठच्या आसपास असणार पण 
कपडे एकदम modern; अगदी in-shirt वगैरे. 
शिवाय चकचकीत belt आणि shoes, polish केलेले. 
डोक्यावर जेमतेम केस पण डावा हात; 
त्यात सोन्याची ठसठशीत अंगठी, उलटा फिरवून 
सात किंवा आठ केसांच्या झुबक्यातुन असा फिरवतो की 
आतां पुढचा action hero हाच.        
 
 
मध्येच त्याने गेम उघडून पाहिला. 
‘You must wait 07 minutes’ असा message वाचून 
स्वत:शी चरफडला. स्टॉपवरील गर्दी वाढत होती आणि 
त्याचा patience संपत आला होता. एक-दोन बस आल्या, 
काही जण गेले सुद्धां. मग आणखी लोक येऊ लागले. 
त्याला कमाल वाटली ह्या गेमची. 
आपल्याला खेळण्यापासून चक्क थांबवतात! 
What daring! समजा ह्या waiting period मध्ये 
आपण दुसऱ्या एखाद्या गेमकडे वळलो, तोच आपल्याला 
जास्त आवडला आणि हा गेम आपण उघडलाच नाही तर ?
 
1 (1)
त्याला हवी असलेली बस एकदाची आली. 
Wind cheaterचं hood सारखं करत तो आत शिरला 
आणि जागा दिसली तिथे बसला.
————————————————-
पाऊस जोरात कोसळू लागला होता पण 
त्याला मात्र कसलीच शुध्द नव्हती. बसच्या जवळ-जवळ 
सगळ्या काचा बंद होत्या. कसही करून आज 
नाईट रायडरला हरवायचं, इतकचं त्याला समजत होत. 
गेम खेळण्याची हुरहूर त्याच्या चेहेऱ्यावर झळकली. 
अजून आला कसा नाही trackवर ? 
इतक्या पावसात network full आहे; आश्चर्यच म्हणायचं.   
 
त्याने गेम उघडला आणि streaming ही अक्षर वाचून 
काटा आला त्याच्या अंगावर. Yes! The fun begins now!! 
पण हे काय??? It’s not showing any cars to choose from! 
च्यायला काय भंकस चालवल्ये ह्या गेमने आज? 
Only trucks and buses!!! Oh no! 
Truck किती जोरात चालवणार? मग बस? 
Okay bus. अरे पण night riderने car निवडली तर??? 
Please God! त्याला सुद्धां bus choose करू दे ! 
नाही तर आमची दोघांची fight कशी होणार? 
Oh yah! Night rider has also chosen a bus!! 
आता बघ रे कशी टफ fight देतो तुला. हरवतोच आज तुला.
 
Night riderने startच इतक्या जोरात घेतला की 
बघता-बघता तो पुढे निघूनसुद्धां गेला. 
एकेक करत बाकीच्यांच्या पुढे जात त्याने 
night riderला गाठलं आणि मागे टाकलं. कधी तो पुढे तर 
कधी night rider. आतां last lap सुरु झाली. 
जीवघेण्या वेगाने दोघ bus चालवू लागले. 
कधी एकमेकाला घासत, कधी ढकलण्याचा प्रयत्न करत तो 
आणि night rider सुसाट वेगाने बस चालवत होते. 
दूरवर finish lineचा flag दिसू लागला तसं दोघांनी 
वेगाची परिसीमा गाठली. आणि अचानक ड्रायव्हरने 
करकचून break दाबल्यामुळे तो पुढे फेकला गेला आणि 
त्याचं लक्ष विचलित झालं. अगदी त्याच क्षणी 
night riderने busचं दार उघडून त्याला लाथ मारली आणि 
तो trackच्या बाहेर फेकला गेला. Shit! Shit!! Shit!!! 
त्याच तोंड पुढे आपटल, नाकावर जबरदस्त आघात 
झाल्यामुळे रक्ताची धार लागली. त्याने सभोवार पाहिलं 
तेव्हां त्याला धक्का बसला. बसमध्ये तो एकटाच होता.    
 
Oh shit ! I am alone in the bus ? 
Where is the conductor? God dammit ! 
Is this some kind of a joke ? 
मला कळल कसं नाही इतका वेळ ? 
क्षणाची उसंत न घेता driverने accelerator 
दाबून bus दामटली आणि तो मागे फेकला गेला. 
आतां बस जीवघेण्या वेगाने पुढे जात होती. 
धडपडत तो कसाबसा उठला आणि मोठया मुश्किलीने 
तोल सावरत driverच्या cabin पर्यंत पोहचला. 
पुढील वाहनांना बाजूला सरकण्यासाठी जोरजोरात 
horn वाजवत राक्षसी वेगाने driver bus चालवत होता. 
जी वाहन बाजूला होत नव्हती त्यांच्या पुढे जाण्यासाठी 
संपूर्ण steering wheel फिरवत आणि पुन्हां उलट फिरवत 
तो भयंकर वेगाने वाट काढत होता. हे सगळ समोरच्या 
काचेतून पाहताना त्याला दरदरून घाम सुटला होता, 
घशाला कोरड पडली होती. त्याला ओरडावंस वाटत होत 
पण तोंडातून एक शब्दही बाहेर येत नव्हता. 
एकेक करत अक्षर उच्चारायचा प्रयत्न तो करत होता, 
शब्द मनात आकार घेत होते पण ओठाच्या बाहेर येतील 
तर शप्पथ ! Driver त्याच्या धुंदीत bus दामटत असल्यामुळे 
तो मागे उभा आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. 
 
Bus आतां एका पुलावरून भरधाव जात होती. 
काही क्षणात पूल पार झाला आणि ती एका खोल 
उतारावरून सुसाट धावू लागली. सरळ रस्ता, मध्येच चढ, 
पुन्हां खोल उतार, परत सरळ रस्ता असं करत-करत ती एका 
कच्च्या रस्त्यावरून थेट जंगलात शिरली. झाडांमधून वाट 
काढत, अनेक झुडपं, वेली तुडवत ती जेव्हां बाहेर आली तेव्हां 
समोर होता एक विस्तीर्ण जलाशय आणि bus कसलीच पर्वा 
न करता थंड वारा कापत एखाद्या बाणासारखी 
त्या दिशेने जात होती. कोणत्याही क्षणी आपल्यासकट 
हा driver जलसमाधी घेणार ह्या भीतीने 
तो आत्यंतिक घाबरला आणि मूर्च्छा येउन खाली कोसळला.              
——————————————————-
चेहऱ्यावर पाण्याचे शिपकारे मारल्यावर 
तात्पुरती शुध्द येते; त्यालाही आली. 
 
‘काय ! फिटली कां हौस रेसिंगची ?’ 
Driver विचारत होता. त्याच्या टोपीवर night rider ही अक्षर 
वाचून त्याचा आ वासला. आणि तो पुन्हां बेशुध्द झाला…
——————————————————–
 
पावसाची रिपरिप थांबली होती. 
बसमध्ये तो एकटाच होता. अबोल. पराभूत. सुन्न. 
सेलवर अक्षर झळकली. 
Game over. You can play this game after 3 hours.  
                         
                                        ————————