हिरवाईने गच्च भरलेला तो पर्वत, सभोवारच्या निसर्गात एखाद्या पाचूप्रमाणे चमकत होता. आणि त्याच्या माथ्यावर एक अवाढव्य, करडा ढग जणू त्याला सुरक्षित ठेवण्याकरीता स्थिर झाला होता. हळू – हळू तो ढग माथ्यापासून दूर सरकू लागला आणि त्या पर्वताच एकेक अंग उलगडू लागल. सायंकाळच्या पिवळसर प्रकाशात त्या पर्वताचा माथा सोन्याचाच होऊन गेला होता. निसर्गाने त्याच्या रंग पेटीतले सर्व रंग जणू आकाशात उधळले होते. विशेषतः लाल रंगाच्या सगळ्या छटांचा अगदी मोक्याच्या जागांवर केलेला वापर, एखादा चित्रकार करेल तसा दिसत होता. अशा नितांत सुंदर स्थळाबद्दल पर्यटकांना माहित व्हायला बरीच वर्ष उलटली हे जरी खर असल, तरी हळू – हळू ते ह्या स्थळाकडे आकृष्ट होत होते एव्हढ मात्र नक्की.

sunset-silhouettes2

पर्वताच्या ज्या बाजूकडून चढायला पाय      होत्या, त्याच्या दुस       बाजूस होती आदिवासीची वस्ती. सूर्यास्त व्ह्यायला आता केवळ काही क्षणांचा अवधी होता. पर्वताच्या माथ्यावर जमलेल्या सर्वांच्या नजरा त्या सुवर्ण बिम्बावर खिळल्या होत्या आणि त्यांचे श्वास एखादा थरार पट बघताना रोखले जातात तसे. जसं काही हा क्षण हातून निसटला तर जीवनात काहीतरी गमावलं अस वाटण्याइतके. आणि तो क्षण आला. पाण्यात हळूच डुबकी घ्यावी तसा एक क्षण सूर्याचा लाल गोळा थोडा हेलकावला व ढगांच्या आड अंतर्धान पावला. नकळत सगळ्यांचे हात जोडले गेले, मस्तक खाली झुकलं आणि तो अविस्मरणीय देखावा पाहून मन तृप्त झालं. थोडा वेळ थांबून जमलेले लोक पाय     उतरू लागले. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रेसोर्ट मध्ये सर्व जण उतरले होते.


शाईची दौत सांडल्यासारख्या गडद निळ्या आकाशात, मोत्याचा सर तुटल्यासारखे पसरलेले तारे. क्षितिजावर दिसणारा, कसलेलं शरीर दाखविणा     मल्लाच्या छातीप्रमाणे रुंद पहाड असणारा काळा पर्वत. आणि अंधारात, काळ्या कागदात कापलेल्या आकाराप्रमाणे भासणारे ते दोघ, भिका आणि जीवा. कालची रात्र त्या दोघांनी तशी जागूनच काढली. आदिवासीच्या ह्या जमातीत मुलींची संख्या तशी नगण्यच म्हणून मुलगी झाली की अगदी आनंदी – आनंदच. शिवाय लग्नातही मुलाकडून भरपूर पैसे, भांडी आणि धान्य मिळण्याची निश्चिंती.  त्यामुळे  मांगल्या पारध्याला मुलगी झाल्याच्या आनंदात सगळ्यांनी मिळून छान दारू ढोसली पण ह्या दोघांनी मात्र थोडी   सबुरी दाखवली. समोर नुकतच मारलेलं हरीण शिजत होत आणि ह्या दोघांच्या डोक्यात काही वेगळच. चंद्र जेव्हा अगदी डोक्यावर आला, तेव्हा एकेक करून सगळे बेहोष झालेत हे पाहून दोघांनी तिथून हळूच काढता पाय घेतला आणि रात्रीच्या अंधारात गायब झाले. बाजूच्या जंगलातली वाट तुडवत ते थोड्याच वेळात वस्ती बाहेर आले होते.

आता ते दोघ आणि गच्च भरलेला अंधार, ह्याशिवाय पूर्ण आसमंतात दुसर काहीच नव्हत. एखादी टिटवी आवाज करत उडत जाई, पायाखाली पानं चूरगळत किंवा काही अंतरावर वाहणा       नदीच पाणी दगडांवर आपटून खळाळे. इतक सोडलं तर आवाज असा नव्हताच. दोघ एकही शब्द न बोलता झपाझप चालत होते. हवेत चांगलाच गारठा होता पण जलद चालण्यामुळे त्यांच्या शरीरा भोवती जणू काही उष्णतेच कवचच निर्माण झाल होत. वस्ती मागे पडल्यावर फक्त एकदाच त्यांनी वळून पाहिलं. नंतर मात्र त्यांच सगळ लक्ष एकवटल समोरच्या पर्वतावर. पहाट व्हायच्या आत त्यांना माथा गाठण गरजेच होत. आणि सूर्यकिरणाची पहिली रेघ दिसायच्या आत सगळ आटपून परतीच्या रस्त्याला लागायचं होत.

खर तर भिका हे करायला धजावत नव्हता पण जीवाने त्याला अगदी भरीस घातलं होत. इतकी वर्ष झाली पण भिकाची बायको गरोदर राहीना. त्यावर उपाय म्हणून काळ्या पर्वतावर जाऊन थोडे विधी करावे अस जीवाने सुचवलं. झाला तर फायदाच होईल, नुकसान नाही हे भिकाला देखील पटलं. आणि म्हणूनच ते दोघ निघाले होते काळ्या पर्वतावर ज्याच्या माथ्यावर दोनशे वर्ष जुन वडाच झाड होत.

पायथ्याशी पोचताच दोघांनी त्या विशाल पर्वताला वाकून नमस्कार केला. आणि एका दमात पर्वत चढायला सुरुवात केली. पहिला चढ सोडला तर हा सपूर्ण पर्वत म्हणजे सरळसोट भिंतच होती. केवळ स्वतःच्या हिमतीवर त्याचा माथा गाठ्ण नक्कीच कठीण काम. त्यात रात्रीचा काळोख. पण दोघांनी न  थांबता पहिला चढ  पार केला. अर्थात खरी दमछाक पुढेच होणार होती हे त्यांना ठाऊक होत. आता ते एका छोट्या पठारावर उभे होते. इथून त्यांना वस्तीचा परिसर अंधुक दिसत होता तो केवळ तिथल्या काही शेकोट्या अद्याप विझल्या नव्हत्या म्हणून. वारा वाहत होता पण ज्या बाजूला अधिक खडकाळ भाग होता तिथून तो वाहत असल्यामुळे हवेत कमी गारठा होता. भिकाने  डोक्याला बांधलेल्या टापशीतून विडीच बंडल काढल आणि दोघांनी विड्या पेटवल्या. काडीच्या प्रकाशात त्यांचे चेहरे शिल्पासारखे कोरीव दिसत होते. एक खोल झुरका घेऊन जीवाने पर्वताच्या चढाकडे नजर टाकली. वर बघताना मानेला रग लागेल अशी काळी कभिन्न भिंत त्यांच्या समोर होती. इथून पुढे खूप काळजीपूर्वक चढाई करावी लागणार होती. कारण चढताना हात आणि पाय रोवायला जागा शोधण तसं कठीण शिवाय अशा अंधारात तर खूपच. आणि थोडासा अंदाज चुकला तरी दोघही  खोल दरीत कोसळणार हे नक्की. त्यामुळे आताचा काळजीपूर्वक पार करण गरजेच होत.

हातातील  बोचक्याना घट्ट गाठ मारून दोघांनी ती गळ्यात अडकवली आणि सावधपणे चढायला सुरुवात केली. कस कोण जाणे, पण जिथे हात किंवा पाय ठेवावा तिथे अगोदरच केल्याप्रमाणे खाचा सापडत गेल्या आणि केवळ अर्ध्या तासात त्यांनी पर्वताच्या माथ्यावर पाय ठेवले. अथांग पसरलेल्या आकाशात चंद्र नेहेमीपेक्षा मोठा आणि जवळ भासत होता. जणू काही तो त्यांच्या अगदी पुढ्यात आहे आणि हात थोडा लांब केला तर त्याला स्पर्श करता येईल. जवळपास सपाट असलेल्या त्या पर्वत माथ्यावर झाड तशी कमीच होती त्यामुळे थोड्या अंतरावर असलेल, एखाद्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे निश्चल दिसणार ते वडाच झाड उठून दिसत होत. आणि निर्जीव काळोखात त्याच्या पारंब्या दगडात कोरल्याप्रमाणे भासत होत्या. आता वेळ दवडून चालणार नव्हत कारण विधी करण्यास पुरेशा अवधीची गरज होती. जीवाने गाठोड सारख केल आणि दोघ त्या झाडाकडे चालू लागले.

414807-bigthumbnail

ते काही पावल जातात तोच त्या झाडाखाली थोडीशी हालचाल झाली जी भिकाच्या लक्षात आली. अभावितपणे त्याने जीवाच्या खांद्याला स्पर्श केला आणि थांबण्याची खूण केली. स्तब्ध उभं राहिल्यामुळे असेल पण झाडाच्या खाली आता त्यांना बरीच हालचाल जाणवू लागली. काय आहे ते बघाव म्हणून दोघ थोडेसे भीत – भीतच पुढे झाले. ती हालचाल पाहताच त्यांचे डोळे विस्फारले, घसा सुकला आणि थंडीतही त्यांना दरदरून घाम फुटला. एकेक पाउल मागे सरकत दोघे तिथून पसार होऊ पहात होते पण त्यांचे पाय जणू जमिनीला खिळलेले होते. दोघांच्या अंगाला भीतीने कंप सुटला होता. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी हळू – हळू मागे सरकायला सुरुवात केली आणि धडपडत ते दोघ कसे – बसे पर्वत उतरू लागले.

झाडाखालील हालचालीने आता वेग घेतला. अनेक दिवसांची भूक भागविण्याकरीता असंख्य श्वापद भक्षावर तुटून पडावीत त्याप्रमाणे त्या कळपाने त्या एकाकी प्राण्यावर चहुबाजुने हल्ला चढवला. आता पर्वतावर होता फक्त काळीज चिरत जाणारा चित्कार, रक्ताचा सडा आणि त्या कळपाचा उन्माद. पर्वताच्या पायथ्याशी रिसोर्ट मध्ये पर्यटक जीवनाचा आस्वाद घेत होते आणि त्याच्या माथ्यावर तीस ते चाळीस माकडांचा हिंस्त्र कळप एका अजस्त्र रानडुकराचे लचके तोडत होता.


काल रात्रीच्या लेट नाईट ‘ बान फायर ‘ डिनर नंतर सकाळी कुणी लवकर उठेल ह्याची खात्री नव्हतीच. शिवाय अशा थंडीत बस देखील स्टार्ट व्हायला वेळ घेणार हे ओघाने आलच. एकेक करत सर्व पर्यटक तयार होऊन बसमध्ये बसेपर्यंत अकरा वाजले. आज जंगल सफारी असल्यामुळे विशेषतः लहान मुल खुशीत होती. बस सुरु होताच गाईडने त्याच्या नेहेमीच्या शैलीत बोलायला सुरुवात केली.

” आज आपण चाललो आहोत जंगल सफारीला. आपापले कमेरे तयार ठेवा. हां पण एक गोष्ट लक्षात असू दे. आणि ती म्हणजे प्राणी बुजरे असतात. ते तुमच्या अगदी पुढ्यात येण्याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे एखादा प्राणी दिसताच गलका करू नका, शांत रहा… “

हमरस्ता सोडून बस जेव्हा जंगलाच्या दिशेने जाऊ लागली तसा गारठा जाणवू लागला. आता बसने एक छानस  वळण घेतल आणि दाट जंगलात प्रवेश केला. उंचच उंच झाडाच्या मधून मार्ग कापत असताना उन्हाचे झोत बसच्या आत लपंडाव खेळत होते. मधेच एखादा सपाट भाग येई आणि सगळे अपेक्षेने बाहेर पहात पण एखाद दुसर हरीण किंवा सांबर वगळता अजून तरी डोळ्याच पारण फेडेल अस काही दिसल नव्हत. अचानक सगळ्याच लक्ष उजवीकडे गेल. हत्तींचा एक कळप अगदी शाळेत पीटीच्या तासाला मुल चालतात तसा एका रांगेत, शिस्तीत चालत होता. ब     च जणांनी फोटो काढायला सुरुवात केली होती. काही जणांकडे व्हीडिओ कमरे देखील होते.

Indian-elephant-herd

” तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हत्तीच्या कळपामध्ये पिल्लं सोडली तर एकही हत्ती नसतो, सगळ्या हत्तीणी असतात. हत्ती साधारण बारा वर्षाचा झाला, की तो कळपापासून वेगळा होतो”. गाईडने माहिती पुरवली आणि ती ऐकून सगळे आश्चर्य चकित झाले.

” हे हत्ती म्हणजे मला अमेरिकनच वाटतात. मुल मोठी झाली, की करा त्यांना वेगळ, असा खाक्या दुसर काय “. एकाने विनोद केला. बस पुन्हा एकदा दाट जंगलात शिरली आणि पर्यटकांमध्ये थोडी चुळबुळ सुरु झाली. कितीही झालं तरी वाघ किंवा सिंह पाहायला मिळाल्याशिवाय जंगल सफारी पूर्ण कशी होणार ? गाईडने त्यांच्या मनातील विचार ओळखले.

“लवकरच आपण सिंह असलेल्या भागात प्रवेश करणार आहोत”. त्याने घोषणा करताच सर्वांचे चेहरे खुलले. “मात्र पुन्हा एक सूचनावजा विनंती आहे. कृपया शांतता राखा. आणि हो, फ्लशचा वापर करू नका… ” हळू – हळू बस मध्ये शांतता पसरली.

आता जगलाचा रस्ता मागे टाकून बस एका विस्तीर्ण प्रदेशात आली होती. सूर्य जरी डोक्यावर असला तरीही हवेतला गारठा कणभरही कमी झाला नव्हता. उलट चहुबाजुने घोंगावणा      वा      मुळे बसमध्ये थोड अधिकच गार वाटत होत. थोड अंतर गेल्यावर जिथून चहुबाजूला दूरपर्यंत व्यवस्थित दिसेल अशा एका मोकळ्या जागेवर बस उभी राहिली. बसपासून साधारण दोनशे फुटावर अर्धा पुरुष उंचीचा पिवळसर हिरव्या गवताचा लांबवर पसरलेला पट्टा होता आणि उजव्या बाजूस होता एक छोटा पहाड. आता वारा देखील कमी झाला होता. फक्त क्षितीजावर निर्माण होणा     हलक्या तरंग रेषा सोडल्या, तर कुठेच काही हालचाल नव्हती. त्यामुळे वातावरणात एक गूढ शांतता निर्माण झाली होती. अचानक बसमधील कुणाचं तरी लक्ष डाव्या बाजूस गेलं. साधारण तीस – चाळीस हरणाचा एक कळप,  इकडे – तिकडे बघत येत होता. काही हरण गवतात तोंड खुपसून काहीतरी शोधत होती,  तर काही माना वर करून हवेत वास घेतल्यासारखी करत होती. सर्वानी कमेरे सरसावले. फ्लश न वापरता फोटो घ्यावेत अस गाईडने सांगितल होतच. तितक्यात उजव्या बाजूस थोडी हालचाल झाली जी गाईडच्या नजरेतून निसटली नाही. एक सिहीण अगदी गवतालगत बसून हळू – हळू पुढे सरकत होती. तिने आपल्या पाठीची कमान केली होती आणि मधेच थांबत ती स्थिर नजरेने हरणाना न्याहाळत होती. बहुधा कोणत सावज क्षीण आहे त्याचा अंदाज घेत असावी. दुपारच्या उन्हात तिच्या अंगावरील केस सोनेरी ताराप्रमाणे चमकत होते. काही अंतरावर आपला मृत्त्यू उभा आहे ह्याची हरणाना काय कल्पना असणार ? कारण त्यांना कळू नये म्हणूनच तर दबा धरायला ती सिहीण वा      च्या विरुध्द दिशेकडून पुढे सरकत होती. शिवाय स्वतःला त्या पिवळसर गवतात तिने अगदी बेमालूमपणे मिसळून घेतल होत. मधेच एकदा त्या सिहीणीने अलगद मान वर केली तेव्हा प्रथमच बसमधील सर्वाना ती दिसली आणि त्यांच्या तोंडून एक हलकासा चित्कार निघाला पण गाईडने सर्वाना शांत रहाण्याची खूण केली. श्वास रोखून सर्वजण ते दृश्य पाहत होते. तितक्यात एका मुलाच लक्ष उजवीकडील पहाडावर गेलं. त्या पहाडावरून जणू असंख्य कापसाचे बोळे तरंगत खाली येत होते. ” बाबा, ते बघा बर्फ पडतय !” तो मुलगा आनदाने म्हणाला. त्याच्या वडीलानी सहज तिकडे पाहिलं तर प्रथम त्यांनाही तसच वाटल. ‘” मला तर बाई एखादा रिअलिटी शोच बघतोय अस वाटतय “. एक बाई हळूच म्हणली. ” रिअलिटी शो नाही, हे सगळ खरच घडतय ! तिच्या नव     ने खुलासा केला.

इकडे सिहिण तिच सगळ अंग ताणून हरणाचा घास घ्यायला सरसावली होती. तिने जेमतेम काही पावल उचलून धावायला सुरुवात केली मात्र अचानक त्या पहाडावरून खाली तरंगत येणारे ते कापसाचे बोळे, जे वस्तुतः हजारो ससे होते, जणू एकाच वेळी धनुष्यातून हजारो बाण निघावेत तसे अत्यंत वेगाने खाली येऊ लागले आणि बघता – बघता त्या कळपाने सिहीणीवर हल्ला केला. प्रथम ती ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडली पण तरीही तिने पंजे मारून ह्या अनाहूत सकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यात बरेच ससे प्राणाला मुकले पण त्यांची संख्याच इतकी मोठ्ठी होती की त्यांच्या पुढे ती हतबल झाली. तिच्या शरीराचे अणकुचीदार दातांनी लचके तोडत त्या सशाच्या कळपाने तिला ठार केले.

सर्व पर्यटक आ वासून हे हिंस्त्र दृश्य पाहत होते. हे सर्व इतक्या जलद घडल की कुणालाच व्हीडिओ तर राहूच दे,  फोटो सुद्धा काढण्याच ना भान राहील, ना वेळ मिळाला.


स्टीलचा मुक्त वापर करून बांधलेली आय टीव्हीची सहा मजल्याची इमारत, उन्हात पा      प्रमाणे चमकत होती. जमिनीतून तलवारीच पात वर यावं तसं त्या इमारतीच निमूळत होत जाणार टोक अगदी कोणत्याही क्षणी आकाश फाडेल अस वाटे. अर्थात अशा शेवटाकडे निमुळत्या होत जाणा     रचनेचा उद्देश होता सर्वात वरच्या बिदुवर बसवलेला अत्यंत शक्तिशाली सेन्सर,  जो सटेलाईटद्वारे सर्वदूर घडत असलेल्या घटनांचा मागोवा घेण्याच काम करे. हा सेन्सर म्हणजे जणू आकाशातला  डोळाच. असा सेन्सर आपल्याकडेही असावा, अस इतर टीव्ही चनल्सना वाटण साहजिक होत. शोध पत्रकारितेचा आदर्श म्हणून आय टीव्हीकडे पाहिलं जात असे. सनसनाटी पण सत्य असलेल्या घटना केवळ बातम्या राहू नयेत,  तर अशा घटनाच्या मूळाशी जाऊन सत्याचा शोध घ्यावा असा आय टीव्हीचा दृष्टीकोन होता. बरेच दिवसात विशेष काही न घडल्यामुळे असेल पण हल्ली त्या इमारतीत फार गजबज नसे. अर्थात रोजच काहीतरी घटना घडावी आणि आपण त्याचा पाठपुरावा करावा, अस न वाटणारा पत्रकार विरळाच.

विहंग पेंडसे आपल्या क्युबिकल मध्ये शिरत असतानाच इंटरकाम वाजला. ट्रकिंग सेक्शन मधून माधवन बोलत होता. त्याचा एक्साईटेड टोनच सांगत होता की नक्की काही तरी खास आहे. फोन कानाशी धरत त्याने चटदिशी पीसी आन केला आणि मेल बाक्स उघडला. दोन दिवसाच्या सुट्टी नंतर आज रुजू  झाल्यामुळे मेल्स अगदी ओसंडून वाहत होते पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केल आणि विडोज मिनीमाइज करून माधवनकडे जाण्यासाठी लिफ्टकडे वळला. आय टीव्हीच ट्रकिंग सेक्शन म्हणजे भूल – भुलैय्याच जणू. जागो – जागी ठेवलेले भव्य मानिटर्स,  ते आपरेट करणारा सक्षम कर्मचारी वर्ग,  एका टोकाला वेगवेगळ्या      किंग सिस्टीम्स तर दुस      बाजूला अनालिसिस करणारी टीम,  डेटा सेंटर आणि फीडबक प्रणाली.

AR-151229886

माधवनने विहंगला एका मानिटरपाशी नेल आणि ते दृश्य दाखवल. रात्रीच्या काळोखात नीटस दिसत नव्हत पण मध्येच एखादी हालचाल स्पष्ट दिसत होती. झूम करून पुन्हा एकदा पाहिल्यावर मात्र विहंगचे डोळे विस्फारले. आणि तोंडातून  “शिट !” असा उद्गार निघाला. आय टीव्हीच्या सजग डोळ्याने माकडांनी रानडुकरावर केलेला हल्ला स्पष्ट टिपला होता.

” अन्ड नाऊ लुक अट धिस “. माधवनने पुढच दृश्य स्ट्रीम केल. ह्यात मात्र बरेचसे आकार अगदी स्पष्ट दिसत होते. विहंग तर ते सगळ पाहून जागच्याजागी खिळून राहिला.
” आय कान्ट बिलीव्ह इट “. विहंगचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना.
” इव्हन आय कुडट विहंग,  बट इट सीम्स टू बी  ट्रू    “. माधवन म्हणला.
” धिस इज इनक्रेडिबल ! हे कस शक्य आहे?  मला तर काही तरी गडबड वाटत्ये. पण कुठे ते समजत नाहीये “. विहंग पुरता चक्रावला होता.
” यु मीन टू से, धिस कुड बी मनीप्यूलेटेड ? बाय अवर रायव्हल्स?  नो वे ! नो वन कन  इंटरसेप्ट अवर सिस्टीम अन्ड डिसीव्ह अस… दट इज फार शुअर “. माधवनचा सिस्टीमवर पूर्ण विश्वास होता.
” आपल्याला याच्या मूळाशी जावच लागेल “. विहंग जसं काही स्वतःशीच बोलला.

ती दोन्ही क्लिपिंग काही लोक वगळता पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली. कारण एक तर ती एक्सक्लुझिव्ह होती, शिवाय जो पर्यंत सत्य काय आहे ते समजत नाही,  तो पर्यंत ती लोकांपर्यंत पोहोचण देखील धोक्याच होत. विहंगने रिसर्च टीमला ते क्लिपिंग्ज दाखवले आणि काही कन्क्लूजन मिळतय का ते पाहायला सांगितल. अर्थात त्यासाठी वेळेची गरज होती. त्यांच्यासाठी तर हा एक चलेन्ज होता कारण आजपर्यंत कुणीच अशा प्रकारची घटना पाहिली तर नव्हतीच पण त्याची कल्पना देखील केली नव्हती.

त्याच रात्री आय टीव्हीची स्पेशल टीम मोहिमेवर निघाली ज्यात स्वतः विहंग,  फोटोग्राफर,  को – आर्डीनेटर,  डेटा कोलेटर आणि दोन असिटट्स असे मिळून सहा जण होते. घटना घडल्याची संभाव्य जागा शहरापासून फार तर शंभर एक किलोमीटरवर असेल. शिवाय सटेलाईटने दर्शविलेल लोकेशन देखील जवळपास अचूक असेल ह्याची खात्री होती. तरीही विहंगने त्याचा जीपीआरएस,  स्टडड एक्विपमेंट म्हणून बरोबर घेतला होता.

दोनेक तासात सगळी टीम त्या जागी पोहोचली. खर पाहता तिथे जे घडल, त्याचा विशेष पुरावा मिळण्याची खात्री नव्हतीच, पेक्षा ते काय शोधणार होते ह्याबद्दल ही त्यांना कल्पना नव्हती. तरीही सर्वानी अगदी कसून शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण तिथे कोल्ड ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या,  वेफर्स आणि तत्सम खाद्य पदार्थ ह्याशिवाय काहीच दिसल नाही. होता – होता उन्ह कलू लागली तसं सगळ्यानी जवळच असलेल्या रिसोर्टकडे प्रयाण केल. रात्र तर काढायची होतीच, शिवाय त्या दृश्यात एक बस अगदी स्पष्ट पाहिलेली विहन्गला आठवत होती. ह्या ठिकाणी राहण्यासाठी एकच जागा असल्यामुळे बसमधील पर्यटक तिथेच उतरले असणार असा अंदाज त्याला होताच.

DB448E87-EAE1-E427-566988C6FB745012

रिसोर्टचा मनेजर तर काहीच बोलायला तयार नव्हता पण इतकी अतर्क्य घटना घडली आणि कुणालाच त्याबद्दल माहित नाही हे अशक्य होत. त्या बसमधील पर्यटक देखील दोन दिवस राहून परत गेले होते त्यामुळे त्यांच्यापैकी कुणाला विचारण शक्य नव्हत. मोठ्या प्रयत्नाने विहंगने त्या बसच्या ड्रायव्हरचा पत्ता मिळवला आणि जवळच्या एका गावात तो राहतो अस कळल्यावर त्याच्या घरी जाण्यासाठी एक सुमो ठरवली. त्या ड्रायव्हरने भीतीने अंथरूण धरल होत आणि तेही साहजिक होत. शून्यात नजर लावलेल्या त्या ड्रायव्हरला बघून विहंगला वाईट वाटल. पण तो तरी काय करणार?  एक मात्र बर झालं. त्याच्या आईने सांगितल की त्या दिवशी घरी आल्यावर त्याने जे पाहिलं,  ते सगळ अगदी तपशीलवार सांगितल होत. शिवाय त्याच्या एका मित्राकडून त्याला रिसोर्टला लागूनच असलेल्या पर्वतावर सुद्धा असच काहीतरी अतर्क्य घडल्याच समजल होत. हा फार महत्वाचा धागा विहंगच्या हाती लागला होता. दुस     दिवशी सगळ्या टीमने पर्वतावर शोध घ्यायचं ठरवल.

पहाटेच सर्वानी पर्वताच्या पाय      चढायला सुरुवात केली आणि साधारण एक तासात माथ्यावर पाउल ठेवल. ‘ खरच, काय सुरेख दृश्य दिसतय इथून ‘ विहंगच्या मनात विचार आला. दिवसाच्या उजेडात ते वडाच झाड थोड थकलेलं वाटत होत आणि त्याच्या लांबच – लांब पारंब्या जणू जमिनीच्या दिशेने एका अनामिक ओढीने जात होत्या. सकाळचा मंद प्रकाश, दूरवर पसरलेला हिरवा प्रदेश आणि घोगावणा      वा      मुळे इतस्ततः उडणारे खाद्य पदार्थांचे रिकामे पकेटस –  काहीस अस्वस्थ करणार वातावरण होत त्या पर्वतावर. कुठून सुरुवात करावी ते कुणालाच सुचेना. तितक्यात विहंगच लक्ष त्या झाडाकडे गेलं आणि त्याची पावल तिकडे वळली. झाडाखाली एक सांगाडा पडला होता. त्याच्या आकारावरून तो एखाद्या रानडूकराचा असावा असा अंदाज त्याने काढला. त्याचे फोटोज घेण्यात आले. काही ठिकाणी अर्धवट राहिलेलं आणि आता सुकलेलं मांस स्पष्ट दिसत होत. ‘  हे रानडुक्कर नैसर्गिकरित्या मेल असाव की ह्याच्यावरही… ‘  पहिल्या क्लीप मधील दृश्य त्याच्या डोळ्या समोर तरळलं. तेव्हढ्यात रिसर्च टीमच्या मोनिकाचा फोन आला…

” आम्ही जो रिसर्च केला त्यानुसार ही क्लिप आथेटिक आहे. व्हिच रुल्स आउट द पासिबिलिटी ऑफ  मनिप्युलेशन. अग्रीड, हे खरच अतर्क्य आहे कारण छोट्या आणि दुर्बल प्राण्याने शक्तिशाली प्राण्यावर हल्ला केल्याच उदाहरण शोधूनही सापडणार नाही. हां, फार पूर्वी मी एका बबून जातीच्या माकडाने चित्त्यावर चाल करून त्याला पिटाळून लावल्याचे फोटोज पाहिलेत पण तेव्हढच. हविंग सेड दट,  अलाउ  मी टू शेड सम लाईट ऑन दि नेचर आफ थिस हपनिंग. माझ्या अंदाजाप्रमाणे हा एक मेटाबालिक चेज असावा. अस काही तरी आहे,  ज्यामुळे दुर्बल प्राणी हिंस्त्र होत असावेत. पण ते काय आहे ते मला इथे बसून सांगता येण अवघड आहे “. मोनिकाने तिची बाजू स्पष्ट केली.
” मग तू इथे येऊ शकतेस का? “
” मी येऊ शकेन पण सगळी एक्विपमेंट कशी घेऊन येणार? ” मोनिकाने विचारल.
” ते ही आहेच म्हणा… सगळी नाही पण जितकी गरजेची आहे तितकी आणू शकतेस का? “
” बघते प्रयत्न करून…” मोनिकाने दिलासा दिला.
पर्वताच्या पलीकडील बाजूस उतरून पहाव अस विहंगच्या मनात आल पण त्याचा भिंतीप्रमाणे सरळसोट असलेला उतार बघून त्याने तो विचार बाजूला ठेवला. कोणत्याही सहाय्याशिवाय त्या बाजूने उतरण धोकादायक ठरेल ह्याची त्याला खात्री होती. थोडा वेळ तिथे थांबून सगळे रिसोर्टवर परतले.

दुस     दिवशी सकाळीच मोनिका तिथे पोहोचली. एका मोठ्या ट्रेलर ट्रक मध्ये गरजेची एक्विपमेट टाकून ती इथे आली होती. ती फ्रेश झाल्यावर विहंगने तिला काल घेतलेले फोटोज दाखवले. मोनिका विचारात पडली…
” आपल्याला पुन्हा तिथे जाव लागेल विहंग “. ती जणू स्वतःशीच बोलली.
आज मात्र ते दोघ आणि फोटोग्राफर,  असे तिघेच पर्वताच्या माथ्यावर गेले. बाकी जणांनी आजू – बाजूच्या गावात जाऊन आणखी कुणी ‘ आय विटनेस ‘ आहेत का, ते पहाव अस ठरल.
मोनिकाने अगदी जवळून त्या सांगाड्याच निरीक्षण केल. तिने काही समपल्सही घेतली ज्यावरून तिला त्या रानडूकराच वय, त्याच्या मृत्यूची वेळ, ते कोणत्या कारणामुळे मेल असेल,  अशी बरीच माहिती मिळायला मदत होणार होती. शिवाय इतरत्र पडलेले अनलिसिस करण्यायोग्य बरेचसे समपल्स तिने गोळा केले आणि वेळ न दवडता रिसोर्टवर परतून तिच्या अनलिसिसला सुरुवात केली.
शरीरावर मारलेल्या पंजाच्या ठशावरून  त्या रानडुकराच मरण माकडांच्या हल्ल्यात झालं होत हे कळायला तिला फारसा वेळ लागला नाही. रात्रीचा एक वाजत आला होता पण मोनिका विश्रांती न घेता काम करत होती. बाकी जणांनी आजू – बाजूच्या गावात जाऊन केलेल्या चौकशीत ‘ आय विटनेस ‘ तर राहूच द्या पण अस काही घडल्याचही कुणाच्या कानावर आल नव्हत. त्या वरून विहंगने अंदाज बांधला की अशा घटना खूप प्रमाणात घडल्या नसाव्यात. आणि त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. कारण तसं झालं असत तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. पण तरीही त्यांना लवकरात लवकर ह्या अतर्क्य रहस्याच्या मूळाशी जाणं गरजेच होत. आता त्याची सर्व मदार होती मोनिका काय निष्कर्ष काढते त्याच्यावर…

जेव्हा मोनिकाने तिचे निष्कर्ष सगळ्या टीम समोर मांडले तेव्हा सकाळचे पाच वाजत आले होते. तिने घेतलेल्या समपल्स मध्ये काही कोल्ड ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या,  वेफर्स आणि इतर खाद्य पदार्थ ह्यांचे उरलेले अवशेष देखील होते. मोनिकाने बोलायला सुरुवात केली…
” ह्या अतर्क्य घटनाचा प्रारभ जरी आत्ता झाला असला,  तरी त्याच बीज रोवलं गेलय ब     च अवधी पूर्वी. बाजारात मिळणा     ब      चशा तयार,  पकेज्ड खाद्य पदार्थामध्ये ‘रेनेट’,  जे गायीच्या पोटातील भागापासून बनवल जात, ‘ ग्लिसरीन ‘,  जे प्राणिज पदार्थापासून, ‘ एन्झाइम्स ‘,  जे चीज मध्ये वापरले जातात, ‘ एल – सिइन ‘,  जे बदकाच्या पिसापासून किंवा डुकराच्या खुरामधून मिळवल जात;  असे अ – शाकाहारी अंश वापरले जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की असे अंश वनस्पतीमध्ये देखील असतात. पण बहुधा ते एक्सट्रक्ट करण्यासाठी किंवा ‘ काढून ‘ घेण्यासाठी कराव लागणार सशोधन पूर्ण विकसित झालं नसावं आणि प्राण्याकडून ते मिळवण अधिक सोप, शिवाय कमी खर्चिक असाव. हे सगळ खूपच वाईट आहे…

माझ्या निष्कर्षानुसार पर्यटक टाकून देत असलेले हे सगळे खाद्य पदार्थ,  कोल्ड ड्रिंक्स,  ज्यामध्ये असे घातक अंश थोड्या प्रमाणात का होईना असतात,  ते खाऊन दुर्बल प्राणी हिंस्त्र बनत असावेत. त्यांच्यात घडलेला हा बदल एका रात्रीत नव्हे तर महिनोन महिने हे सगळ खाऊन झाला आहे अशा निष्कषापर्यंत मी पोहचलेले आहे. कारण मला तरी त्यांच्या अशा प्रकारे हिंस्त्र होण्याच इतर दर्शनी कारण दिसत नाही “. सर्व जण हे ऐकून आश्चर्यचकित झाले.
” ब्राव्हो मोनिका ! यु डिड इट !” विहंगला आपला आनंद लपवता आला नाही.

‘अशी अनेक पर्यटन स्थळ आणि तेथील वन्य जीवन आपण टाकून दिलेल्या वस्तूमुळे किती धोक्यात आली आहेत, ह्याची पर्यटकाना कल्पना नसेल. पण आता वेळ आली आहे, त्यांना स्पष्ट शब्दात सागण्याची, प्रसंगी कठोर दंड ठोठावण्याची. शिवाय ‘ फूड अड ड्रग अ     रीटीज ‘ आणि खाद्य पदार्थ बनविणा      कंपन्याना सुद्धा एक दणका द्यावा लागेल… आणि जो पर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही,  तो पर्यंत ह्या प्रदेशाला सील करण्याची व्यवस्था करावी लागेल…’  विहंग स्वतःशीच विचार करत होता.

     ———————————-