दादासाहेब सरदेशमुख पेशाने वास्तू रचनाकार होते. साठीतही तरुणाना लाजवेल अशी देहयष्टीरोज सूर्य नमस्कार घालण्याचा नेम, मर्यादित आहार आणि सदैव हसतमुख चेहरा अशा माणसाला कुठलाही आजार शिवण शक्यच नव्हत. मग अचानक प्रथम मधुमेहनंतरछातीच दुखण असं एकेक करत त्यांची तब्ब्येत ढासळायला लागली. त्यांचा मोठा मुलगा अरविंद आणि धाकटा भास्कर ह्यांच्या सांगण्यावरून दादासाहेबानी एक प्रकारे सक्तीची निवृत्ती पत्करली होती. शहरातील धकाधकीच्या जीवनाला ते कंटाळले होतेचशिवाय तब्ब्येतीच्या तक्रारीमुळे  बाहेर देखील पडेनासे झाले. गावाकडील जमिनीवर घर बांधाव असं फार दिवसापासून त्यांच्या मनात होत पण त्यांची मुल होती आधुनिक विचार सरणीची. त्यांना गावाकडच वातावरण आवडत नसे. पण आता नुसतच बसून राहण्यापेक्षा आपल्या घराच स्वप्न पूर्ण कराव अशी इच्छा दादासाहेबांच्या मनात आली. कारण अस ही अधून – मधून तिथे जाण्या व्यतिरिक्तत्यांच त्या जागेकडे दुर्लक्षच झालं होत. आपल्या मनात असं काही चाललय हे घरी बोलाव तर विरोध होईल ह्या भीतीने कुणाला न सांगता त्यांनी गावाकडे प्रयाण केल. ते आणि सोबत घेतलेले मजूर असे सगळे गावी पोहचे पर्यंत दुपार झाली. ती जागा गावाच्या टोकाला होती, जिथून पुढे जंगलाचा प्रदेश सुरु होई. त्या जागेवर वाढलेले उंचच-उंच वृक्ष  पाहून हीच का ती जागा ? असा प्रश्न त्यांना पडला. इथे घर बांधायचं तर सगळ्यात आधी ती जागा साफ करून घ्यावी लागणार होती. मजुरांना सूचना देऊन दादासाहेब एका दगडावर टेकले. 

P1030349

संध्याकाळ पर्यंत ती जागा अगदी सपाट झाली आणि तिथे शिल्लक असलेले बरेचसे काळे दगड आता अगदी स्पष्ट दिसू लागले. ते दगड त्यांनी पूर्वी देखील पाहिले होते पण नैसर्गिक रचनेचा एक भाग ह्या अर्थाने. आज जेव्हा ती सगळी जागा मोकळी झालीतेव्हा तेच दगड एका नव्या अर्थाने त्यांना सामोरे आले. काही ठिकाणी चौरसतर काही ठिकाणी गोल असलेले आणि काही जागी अर्धवट भिंत असल्याप्रमाणे ते दगड पाहून दादासाहेबांच्या मनातला वास्तू रचनाकार जागा झाला. ते दगड म्हणजे कोणते तरी पुरातन अवशेष असावेत हे त्यांच्या अभ्यासू नजरेने ओळखल. ही जागा आपल्याकडे वारसा हक्काने आली म्हणजे आपणही त्या वंशावळीतील आहोत का ? त्यांना प्रश्न पडला. त्यांनी ती सगळी जागा काही लिखित पुरावा सापडतो का ह्यासाठी शोधून पाहिली. पण त्या काळाकडे निर्देश करेल असं काहीच त्यांना सापडलं नाही. रात्र होताच गावात रहात असलेल्या बहिणीच्या घरी त्यांनी मुक्काम केला. मजुरांनी मात्र तात्पुरता राहुट्या बांधून तिथेच राहण पसंत केल. 
 
सकाळी जेव्हा दादासाहेब पुन्हा त्या ठिकाणी गेले, तेव्हा एक सोडता बाकी सारे मजूर तेथून पळून गेले होते. मागे राहिलेला मजूर देखील निघण्याच्या तयारीत होता पण त्यांना बघून थोडा थांबला इतकच. रात्रभराच्या जागरणाने त्याचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते. त्या मजुराच्या सांगण्याप्रमाणे रात्रभर एका गूढ आकृतीने सगळ्या मजुरांना सळो की पळो करून सोडल होत. त्या आकृतीने एकाला ही झोपू तर दिल नाहीच, शिवाय चित्र – विचित्र अवतार धारण करून घाबरवल होत. सकाळ व्हायच्या आतच बहुतेक सगळे मजूर सामान – सुमान तिथेच टाकून पळून गेले होते. ते कोणत्या आकृती बद्दल बोलत होते हे दादासाहेबाना कळेना. उरलेला मजूरही थोड्याच वेळात तेथून निघाला. आता मात्र ते पुरते गोंधळले. भूता – खेतांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता तरीही त्यांनी ह्या गोष्टीची शहानिशा करायचं ठरवल. पण विचारायच कुणालाहे त्यांना कळेना. आजूबाजूला चौकशी करावी, तर ब        च अंतरापर्यंत एकही घर दिसेना. शेवटी थोड अंतर चालून गेल्यावर जी काही घर लागली तिथे विचारपूस केल्यावर त्यांना खूपशा गोष्टींचा उलगडा झाला. 
————————————————————————

 

peshwafort_large

काळ्या दगडामध्ये बांधलेला तो वाडा पेशवे बाळाजी विश्वनाथ भट ह्यांचे विश्रांती स्थान होते. पुण्यापासून काही कोस दूर असलेली ती वास्तू पेशव्यांनी स्वतःच्या पसंतीनुसार खास बांधून घेतली होती. त्या वाड्यातील प्रत्येक खोलीची रचना, तसच बैठकाझुंबर आणि फरशा देखील पेशव्यांनी आपल्या आवडीनुसार बनवून घेतल्या होत्या. इतकच नव्हे तर मुद्पाक खान्यातील सर्व चीज – वस्तूभांडीकुंडी, गवाक्ष तसच दरवाजांची दिशा काय असावी इथपर्यंत प्रत्येक बाबीत त्यांच्या पत्नीने बारकाईने लक्ष घातले होते. वाड्याच्या भिंती चांगल्या चार फूट जाड असल्यामुळेशिवाय मागच्या बाजूस कोस दीड कोस अंतरावर असलेल्या तलावामुळे भर उन्हाळ्यात देखील इथली हवा थंड असे. राज्य कारभाराच्या धबडग्यातून चार दिवस मजेत घालविण्यासाठीच तर तो वाडा बांधला गेला होता. तब्बल सहा वर्षानंतर वास्तुच बांधकाम पूर्ण झालं.               
————————————————————————
पेशव्यांच्या हुजूर दफ्तर मधून बोलावण आल तेव्हा गजानन पेंडसे आश्चर्यचकित झाला. आपल्याला पुण्यास का बोलविण्यात आले आहे ते त्याला उमगेना. निरोप्याने इतकच सांगितल की त्याला पंत प्रतीनिधीनी भेटण्यास बोलावले आहे. दुस       च दिवशी पहाटे गजानन पुण्याकडे रवाना झाला. तेजपुंज व्यक्तिमत्वकपाळावर उभे गंधगोरा रंगनिळसर डोळे आणि राजपुत्राला शोभेल अशी चाल असणा   गजानन पेंडसे कडे येणारे – जाणारे लोक निरखून बघत. पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी तो प्रथमच येत होतात्यामुळे थोडा बुजला होता. शिवाय दिलेल्या वेळेत पोहचण्याच दडपण होत. पेशव्यांच्या हुजूर दफ्तरमध्ये पोहचेपर्यंत त्याला बराच अवधी लागला. पंत प्रनिधीनीच्या दालनाबाहेर त्यांची भेट घेण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. परंतु गजानन आल्याची वर्दी मिळताच काही क्षणातच पंत प्रनिधीनीचे बोलावणे आले.  

” या गजाननआसनस्थ व्हा “. पंत प्रनिधीनीनी त्याचे हसून स्वागत केले. त्यांनी आपले आदरार्थी संबोधन केले ह्याचा गजाननला अचंबा वाटला. वेळ न दवडता पंत प्रतिनिधीनी मुद्द्यास हात घातला. 
” आम्ही का बोलविले आहे ते आपणास माहित नसेल कदाचित. नारायण सुर्वेनी आपली शिफारस केली आहे आमच्याजवळ “.  
” नाहीमला त्याबद्दल कल्पना नाही “. गजाननने खुलासा केला. 

220px-Madhu_Rao_Narayan_the_Maratha_Peshwa_with_Nana_Fadnavis_and_attendants_Poona_1792_by_James_Wales

” श्रीमंत पेशवेनी पुण्याजवळ एका वास्तूचे निर्माण केले आहे. तेथे एका विश्वासू आणि कर्तबगार माणसाची गरज आहे. आम्हाला हे सांगण्यास अतीव आनंद होत आहे की आम्ही तुमची  नेमणूक त्या वास्तूचा राखणदार ह्या नात्याने करीत आहोत “. नेमणूकीचे दस्तावेज गजाननच्या हाती सोपवत पंत प्रनिधीनी म्हणाले. 
” माझ्यावर ही जबाबदारी सोपवून आपण मला उपकृत केले आहे. मी वचन देतो की सर्व शक्तीनिशी मी त्या वास्तूचे रक्षण करेन “.अदबीने झुकून गजानन म्हणाला. त्याच्या चेह      वर आनंद स्पष्ट दिसत होता. 
” आपण नकार देणार नाही ह्याची आम्हाला खात्री होती. तुमच्या राहण्याची सोय वास्तुवरच करण्यात आली आहे. आपण कधी रुजू होऊ शकता ते कळवा, म्हणजे त्याबद्दल आगाऊ खबर आम्हाला पोहचवता येईल “. 
” मी आपला अत्यंत आभारी आहे. चलतो “. इतक बोलून गजानन तेथून निघाला. 
 
कोतवाल नारायण सुर्वे ह्यांनी पंत प्रतिनिधीकडे शिफारस केल्यामुळे पेशव्याच्या वास्तूवर राखणदार ह्या नात्याने आपल्या सारख्या साध्या हविलदाराची नेमणूक झाली ह्याची गजाननला जाणीव होती. आणि थोड आश्चर्य देखील वाटत होत. परंतु कोतवाल सुर्वेच्या मते गजाननची आत्मीयतेने काम करण्याची वृत्तीनिर्व्यसनीसत्शील प्रवृत्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच वेळी अनेकांशी लढण्याकरीता आवश्यक असं छुप्या युध्द कलेच ज्ञान ह्या बाबी त्याच्या नेमणुकीस कारणीभूत ठरल्या.  
————————————————————————
तो एक मजली वाडा म्हणजे वास्तू शास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. वाड्याच्या खालच्या भागात तीन प्रवेश द्वारे होती. मध्य भागी असलेल्या  मुख्य प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजू कडील द्वार होते सेवकाच्या कक्षाकडे जाण्यासाठीतर उजव्या बाजू कडील द्वार होते गाई – गुरांच्या गोठया कडे जाणारे. सेवक कक्षास लागूनच दोन साठवणीच्या खोल्या होत्या. मुख्य प्रवेश द्वाराच्या आत डाव्या हातास कार्यालय तर उजव्या बाजूस देवडी होती. दोघांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या मार्गिकेमधून गेल्यावर एक विस्तीर्ण चौक आणि त्याच्या पुढे होती बैठकीची खोलीज्याच्या उजवीकडे आणखी एक साठवणीची जागा तर डाव्या बाजूस मुद्पाक खाना होता. ह्यांच्या पुढे असलेल्या आणखी एका मोठ्ठ्या चौकातून पुढे गेल्यावर कुटुंबांच्या भेटी – गाठी करीता एक मोठा कक्ष होता. वरच्या मजल्यावर जाण्या करीता चौकातून दोन जिने होते. ज्यापैकी एक जिना जात असे दरबाराकडे तर दुसराडाव्या व उजव्याअशा दोन्ही बाजूंकडे असलेल्याकुटुंबांकरीता असलेल्या कक्षांकडे. ह्या कक्षांची द्वारे उघडत असत सज्जाकडे.

Vishrambaag_Wada-Ramnath_Bhat_(Copy)  
 
वाड्याच्या बांधकामासाठी जेजुरी येथील चुनखडीचिंचवड येथील खाणी मधील दगड आणि  जुन्नरच्या जंगलातील लाकूड मागविण्यात आले होते. नक्षीदार दर्शनी दरवाजालाकडामध्ये कोरीव काम केलेले सज्जेछताला उचलून धरणा     खांबांवर नाजूक फुलांची नक्षी, पर्शियाहून खास मागविलेले गालिचेभिंतींवर दर्शविण्यासाठी चित्रकारांकडून खास बनवुन घेतलेली रामायण आणि महाभारतातील प्रसंगावर आधारित चित्रेपाण्याच्या दाबासरशी आपोआप उघडणारे व बंद होणारेमधल्या चौकाच्या डाव्या बाजूस असणारे कमळ कारंजे, अशा अनेकानेक वैविध्यानी तो वाडा नटलेला होता. शिवाय तलावापासून काढलेला जल मार्गज्या द्वारे पाणी थेट वाड्यातील हौदात पडत असे. वाड्याचे दर्शनी, दिमाखदार रूप पाहून गजानन चकित झाला. आज त्याचा वाड्यावरील पहिला दिवस होता. वाड्याच्या डाव्या बाजूस असलेल्या प्रवेश द्वाराच्या उंब         स स्पर्श करून त्याने देवडीत, अर्थात सेवक कक्षात प्रवेश केला. 
———————————————————————–

काही दिवसातच गजाननने वाड्याच्या सुरक्षेकरीता अत्त्यावश्यक बाबींची एक यादी बनवली व अपेक्षित खर्चाची नोंद करून ती हुजूर दफ्तरमध्ये विचार विनिमया करीता पाठवून दिली. ज्यामध्ये आगीपासून सुरक्षावेळ प्रसंगी पुरापासून असलेला धोका असण्याची  शक्यता व त्यावरील उपायसुरक्षे करीता लागणारी हत्यारे तसेच वाड्यावरील इतर कार्मिकाना आवश्यक असलेले परपरागत युध्दशास्त्राचे प्रशिक्षण अशा अनेक बाबींचा समावेश होता. काही दिवसातच हुजूर दफ्तर कडून सर्व बाबींची पूर्तता करण्याचा हुकुम आला.मध्ये एकदा पेशवे बाळाजी विश्वनाथ भट सहकुटुंब चार दिवसासाठी राहून गेले. त्यांना देखील वाड्यावरील सुरक्षा व्यवस्था पाहून संतोष झाला. त्याबद्दल त्यांनी गजानन पेंडसेची पाठ थोपटली आणि आपल्या गळ्यातील एक रत्न हार त्याला भेट दिला. अशी काही वर्ष गेली आणि एक अघटीत घडल.

w640 
 
बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी ब्रिटीशा समोर शरणागती पत्करली. त्या वेळी वाड्यावर गजानन आणि साफ – सफाई करणारी माणसं सोडली तर पेशव्यांच्या परिवारातील किंवा विश्वासातील इतर कुणीच नव्हत. गजाननला तर ती बातमी ऐकून धक्काच बसला. पण पेशव्यांच्या मनस्थितीची कल्पना आपल्याला कशी येणार ? असा विचार करून तो पुढील कामास लागला. सर्वात प्रथम त्याने वाड्यावरील सर्व माणसाना एकत्र बोलावल. 
 
” श्रीमंत पेशव्यांवर एक दुर्धर प्रसंग ओढवला आहे. ब्रिटीशानी कावा करून त्यांची सा   बाजूनी कोंडी केली आहे. अशा प्रसंगी  त्यांना धीर द्यायला आपण तिथे नाही. पण ज्या वास्तूचे रक्षण करण्यासाठी आपण इथे आहोतते कार्य आपल्याला प्राणपणाने करावयाचे आहे. ह्या वाड्यात खूपशा मौल्यवान चीज – वस्तू आहेतज्या चोरांच्या किंवा ब्रिटीशांच्या हाती लागायला नकोत. कारण ह्या सगळ्या वस्तू पेशव्यांची निशाणी आहे. देव कृपेने श्रीमंत पेशवे गेलेले राज्य परत मिळवतीलच. आपण त्या दिवसाची वाट पाहू. पण तो पर्यंत ह्या मौल्यवान वस्तू आपल्याला सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवाव्या लागतील. मला तुम्हा सगळ्याकडून एक वचन हव आहे. ह्या मौल्यवान वस्तू आपण कुठे लपवल्या आहेत हे गुपित तुमच्यापैकी कुणीही फोडणार नाही. पुढे – मागे तुम्हाला मोहात फसवल जाऊ शकततुम्ही ती जागा ब्रिटीशाना किंवा आणखी कुणाला दाखवावी म्हणून लाच दिली जाऊ शकते. तुम्ही सावध असायला हव. आज पर्यंत तुम्ही मला साथ दिलीत. मला आशा आहेअशीच साथ तुम्ही शेवट पर्यंत द्याल. पण मी तुम्हाला इथे थांबण्याची सक्ती करणार नाही. परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही आपापल्या घरी जाऊ शकता. मला वचन द्या, की हे गुपित तुमच्या हृदयातच राहील “. 
” आम्ही वचन देतो “. छातीवर हात धरत सगळे एक सुरात म्हणाले. 
” शाब्बास ! आता आपल्याला कामाला लागायला हव. सगळ्यात प्रथम वाड्याचे सर्व दरवाजे बंद करून घ्या. आज रात्रीच आपल्याला वाड्याच्या सुरक्षेसाठीतसच मौल्यवान वस्तूना सुरक्षित ठेवण्यासाठी काहीतरी कराव लागणार आहे “. इतक बोलून त्याने सर्वाना पुढील सूचना द्यायला सुरुवात केली. त्याने दिलेल्या सुचने बरहुकुम वाड्याची सर्व सुरक्षा पूर्ण होण्यास एक मास  लागला.

————————————————————————

बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी ब्रिटीशा समोर शरणागती पत्करून आज दोन मास उलटून गेले होते. गावात भितीच वातावरण होत. सगळीकडे चोर – लुटारूंचा सुळसुळाट झाला होता. वास्तविक एका वेळी अनेकांशी लढण्याची कला गजाननला अवगत होती. पण सध्याचा काळ वेगळा होता. दररोज कुणाचा न कुणाचा खून झाल्याची खबर त्याच्या कानावर येत होती. राजा नसलेल्या राज्याच आणखी काय होणार ? साफसफाई करण्याकरीता जी माणसं कायम स्वरूपी वाड्यावर राहत होती, ती देखील एकेक करून आपापल्या घरी परतली होती. त्यामुळे गजाननला वाड्याच्या बाहेर पडण देखील अशक्य होत. माणसांची कुमक मागविण्या सम्बन्धी निरोप धाडून सुद्धा अजून पर्यंत कोणीही वाड्यावर फिरकल नव्हत. हा वाडा ब्रिटीशांच्या नजरेतून सध्या तरी सुटला ह्या  गोष्टीच त्याला आश्चर्य वाटल. पण आज ना उद्या त्यांची फौज वाड्याचा ताबा घेण्यासाठी येणार हे त्याला पक्क ठाऊक होत. हातातील तलवारीच्या पात्यावर हलकाच हात फिरवत गजानन विचारात गढला होता.  
               
रात्रीचा एक प्रहर झाला असेल. एक फिरता हविलदार नुकताच वाड्याच्या दारावरून ” जागते रहो ” ची हाळी देऊन गेला. थोड्या वेळा पूर्वीच गजाननने संपूर्ण वाडा फिरून सार काही आलबेल असल्याची खात्री करून घेतली होती. आणि सगळी प्रवेश द्वारे बंद करून तो वाड्याच्या मध्य भागी असलेल्या चौकाच्या बाजूस असलेल्या हौदावर हात – पाय धुवत होता. दिवटीच्या उजेडात हलणा    सावल्या विचित्र आकार धारण करीत होत्या. तितक्यात वरील बाजू कडून टप्प ‘ असा आवाज आला. त्याला वाटल झाडावरून एखाद फळ पडल असेल. पण काही क्षणातच वाळलेली पानं चुरगळावीत तसे काही आवाज आले. पाठोपाठ अगदी हलकेच कुणीतरी पावल ठेवत आहे असे आवाज. आता तो सावध झाला. झटकन दिवटी विझवून त्याने हातातील तलवार परजली आणि मोठ्या आवाजात ” कोण आहे रे तिथे ! ” असं गरजला. अचानक सार शांत झालं. अंधारात त्याचे डोळे चहुबाजूने फिरत होते. पण कुठेच कसलाही आवाजनव्हता. पलीकडच्या भिंतीवर काही सावल्या हलल्या. शिवाय आजूबाजूच्या अंधारात त्याला काही हालचाल जाणवली. दबक्या पावलांनी तो बाहेरील चौकात जाणा   मोकळ्या जागेत कानोसा घेतभिंती लगत उभा राहिला. साध्या वेशातील साधारण सत्तर ते ऐशी ब्रिटीश सैनिक बाहेरील चौकात जमले होते आणि तीन ते पाच जण एकत्र येऊन वाड्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जात होते. त्यांना खुणा करून काही सांगत असणा       , वाड्यावर घोड्याना खरारा  करणा        गोविंदला ओळखायला त्याला वेळ लागला नाही. त्याने केलेला दगा पाहून गजाननने ओठ आवळले. इतके सगळे सैनिक इथपर्यंत आले होते म्हणजे तयारीनिशी आले असणार ह्यात शंका नव्हती. भिंतीच्या आडून गजानन त्यांची हालचाल बघत होता पण अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हत. काही जणांच्या हातात सोटेकाठ्या तर काहीच्या हातात तलवारी तसच खंजीर होते. ‘ सगळी प्रवेश द्वार बंद असताना इतके सैनिक आले कुठून ? ‘ बहुधा वाड्याच्या आजूबाजूस असलेल्या झाडांवरून सज्जामध्ये उडया मारून आले असावेत असा आडाखा त्याने बांधला. आज गजाननची कसोटी होती आणि एव्हढे दिवस वाड्याच्या सुरक्षेसाठी जी तयारी त्याने केली होती तिची देखील. इतक्या सगळ्यांशी समोरासमोर दोन हात करण्याची वेळ येऊ शकते हा अंदाज त्याला होताम्हणूनच तर त्याने वाड्याच्या अंतर्गत भागात काही बदल करवून घेतले होते. ‘ आता या माझ्या सटक्यातबघतोच एकेकाला ‘ मनाशी म्हणत तो मागल्या पावली अंधारात नाहीसा झाला. आता सुरु झाला एक जीवघेणा खेळ. गजानन आणि ऐशी ब्रिटीश सैनिका मधला. 
 
गजाननच्या अटकळी प्रमाणे काही सैनिक वरच्या मजल्यावर थांबून राहिले होते. जर तो खालीच सापडला तर काम फत्तेनाही तर ‘आपण आहोतच ‘ असा त्यांचा अंदाज होता. सहा ते आठ सैनिक मुद्पाकखान्यात घुसले तेव्हा आत कुणीच नाही हे त्यांना समजल पण हे लक्षात आल नाहीकी पुढच्याच क्षणी त्यांच्यावर भयंकर हल्ला होणार आहे. ते जायला वळणार इतक्यात समोरून त्यांच्या तोंडावरशरीरावरतोफेच्या गोळ्याप्रमाणे भांड्यांचा मारा झाला. ज्यात त्यांची तोंडअंग इतक सडकून निघाल की त्यांना जागच उठताच येईना. फडताळाच्या आडून गजाननचा हात अचूक वेध घेत होते. ते सैनिक जिथे पडले तिथेच विव्हळत राहिले. गजानन तिथून पसार झाला.  
 
बैठकीच्या खोलीत असलेल्या काही सैनिकाना भिंतीवर हातात तलवार घेतलेल्या माणसाची एक प्रचंड मोठी सावली दिसली. त्यांनावाटल मागूनच कुणी तरी आल असाव म्हणून ते वळले तो काय ! मागे कुणीच नव्हत. उलट त्या सावलीच्या आडोशाला उभा असलेला गजानन बाहेर आला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. ती सावली म्हणजे दुसर – तिसर कुणी नसून कोप       तेवत असलेल्या दिव्यासमोर ठेवलेलाकागद कापून बनविलेला माणसाचा आकार होता. सैनिकांच्या किंकाळ्या ऐकून काही जण तिथे धावले पण त्या अगोदरच गजानन दबक्या पावलांनी हौदा जवळ आला. जमीनीलगत राहून त्याने तिथे कुणी आहे कात्याचा अंदाज घेतला.हौदाच्या बाजूलाच असलेल्या एका सेवक कक्षामध्ये त्याला हालचाल जाणवली. झटदिशी पुढे होत त्याने त्या कक्षाचे दार बाहेरून लावून घेतले. आतमधील सैनिकाच्या जेव्हा हे लक्षात आलेतेव्हा ते मदतीसाठी ओरडू लागले. गजानन त्याचीच वाट बघत होता. अडकलेल्या सैनिकाना सोडविण्या करीता जे चार-पाच सैनिक आलेते आयतेच त्याच्या तावडीत सापडले. एका अंधा   कोप   तून बाहेर येत त्याने ‘ भूत – भूत ‘ अशी आरोळी ठोकली. अचानक झालेल्या हल्ल्याने ते सैनिक पुरते गांगरून गेले आणि तलवारीचे सपासप वार करत गजाननने त्यांची खांडोळी केली. आतील सैनिकाना तसच सोडून त्याने कुटुंब कक्षाकडे धाव घेतली. वाड्यावरील मौल्यवान वस्तू त्याने केव्हाच लपवल्या होत्या पण हाताला येतील त्या किरकोळ चीज – वस्तू घेण्यात तिथे दहा – पंधरा सैनिक गुंतले होते. पाठीमागून येत त्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली आणि बघता – बघता तिथे प्रेतांची रास लागली. बाहेरील बाजूस एकच गलका उठला. आत्तापर्यंत ब्रिटीश सैनिकाना सावरायची किंवा प्रतिहल्ला करायची संधीच त्याने दिली नव्हती त्यामुळे ते सगळे विस्कळीत झाले होते. आणि त्याचाच फायदा उठवत गजानन त्यांना एकट-दुकट गाठून ठार करत होता. तितक्यात बंद कक्षाचे दार उघडण्याचा आवाज त्याने ऐकला. दोन – तीन पावलात त्याने वरच्या मजल्यावर जाणारा जिना गाठला आणि अंदाज घेत वरील बाजूकडे जाऊ लागला. 

Library at Lakshmi Vilas Palace in Baroda - 1895
 
दरबार कक्षामध्ये काही सैनिक त्याचा शोध घेत होते. त्यांच्या मागून दबकत येत गजाननने भिंतीच्या कडेला असलेली एक कळ दाबली. त्यासरशी आतील सर्व झुंबर उजळून निघाली आणि वा      वर हिंदकळावीत तशी हलू लागली. शिवाय कानठळ्या बसवणारे घुगरांचे आवाज देखील येऊ लागले. शांततेचा अचानक भंग झालेला पाहून सैनिक दचकले आणि  इकडे – तिकडे पाहू लागले. हलत्या झुंबराच्या प्रकाशात त्यांच्या सावल्यांनी चित्र – विचित्र आकार धारण केले ज्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. आणि त्यांच्या स्वतःच्याच सावल्या एकमेकावर हल्ला करीत आहेत असा आभास निर्माण झाला. ह्या सगळ्या गोंधळात गजानन कधी आत आला आणि त्याने सैनिक उभे असलेल्या गालीचास सर्व शक्तीनिशी हिसडा देऊन त्यांना खाली पाडलेते त्यांच्या लक्षातही आले नाही. अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने ते भांबावले आणि गजानन त्यांच्यावर तुटून पडला. तितक्यात खालच्या बाजूकडून आणखी सैनिक वर आले परंतु गजानन पुढे त्यांचा निभाव लागला नाही. संपूर्ण दरबार कक्षात सैनिकांच्या किंकाळ्याचे आवाज घुमू लागले. गजाननच्या अंगात वीरश्री संचारली होती. वरील बाजूस एकही सैनिक शिल्लक नाही ह्याची खात्री करून गजानन खालील बाजूस आला.       
 
खालील चौकात उरलेले सैनिकजे आता पुरते घाबरले होतेपळून जाण्याचा विचारात होते. तेव्हढ्यात गजानन त्यांच्या पुढ्यात येऊन ठाकला. आता त्यांना लढण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ते पुढे येऊन हल्ला करणार एव्हढ्यात गजाननने तलवार हवेत उंच धरत आरोळी ठोकली. 
 
” जो पाउल पुढे टाकेल त्याच मुंडक उडवून हातात देईन ! “ गजाननचा त्वेष आणि एकूण अवतार बघून सगळे स्तब्ध उभे राहिलेतर भीतीने गोविंदच्या हातातली काठी गळून जमिनीवर पडली. त्याचा आवाज विरतो न विरतो तोच तलवार परजत गजाननने त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रथम डावीकडून येणा       दोघांचे गळे चिरत उजवीकडून येणा     एकावर त्याने जोरदार लत्ता प्रहार केला. आणि तसचपुढे जात एका फटक्यानीशी त्याने एकाच्या खांद्यावर तर गोविंदच्या छातीवर  वार केले. तेव्हढ्यात पाठी मागून येणा       तिघांनी त्याला गाठल आणि त्याच्या अंगावर सोट्याचा वर्षाव झाला. तरीही त्याची तलवार फिरत राहिली ज्यात आणखी दोघ ठार झाले. आता मात्र उरलेल्याच अवसान गळून पडल आणि पाय फुटेल तिकडे ते पळू लागले. तरीही गजाननने त्यांची पाठ सोडली नाही. ” कुठे पळता ठ्गानो ” असं ओरडत तो त्यांचा पाठलाग करू लागला. थोड अंतर जाऊन तो थांबला. आणि तिथेच घात झाला. पाठीमागून एका सैनिकाने त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. ” आई ग ” अशी किंकाळी फोडून गजानन जमिनीवर कोसळला. पण पडता – पडता त्याची तलवार मारेक      च्या पायांवर फिरली होती आणि एकाच सपका      त तिने त्याला आयुष्यभर पांगळ करून ठेवण्याच काम केल होत. खंजीर पाठीतून निघून छातीच्या आरपार झाल्यामुळे गजाननच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तरी त्याने सर्व शक्तीनिशी हात पाठीमागे घेऊन खंजीर उपसण्याचा प्रयत्न केला. परंतु तो केवळ काही इंच इतकाच बाहेर ओढण्यात त्याला यश मिळाल. त्याच्या शरीरा भोवती रक्ताचे पाट वहात होते. काही क्षणातच त्याची शुध्द हरपली. वाड्याचे रक्षण करण्यात गजानन यशस्वी झाला परंतु त्याकरीता त्याला स्वतःच्या प्राणांचे मोल द्यावे लागले. 
———————————————————————–

रणरणत्या उन्हात तो भग्न वाडा खूपच उदास वाटत होता. वाड्याच्या दगडी भिंती सोडल्या तर लाकूड कामात केलेल्या नक्ष्या केव्हाचगळून पडल्या होत्या. एके काळी दिमाखदार दिसणा     त्या वास्तूला आज अवकळा आली होती. त्या वाड्याच्या जागी दगडी चिरे सोडले, तर आता काहीच उरल नव्हत. काही भुरट्या चोरांनी वाड्याच्या भग्न अवशेषां मध्ये काही चीज – वस्तू मिळतात का ते पहायचा प्रयत्न केला तेव्हा एक धोतर नेसलेला माणूस दिसल्यामुळे भीतीने गांगरून त्यांना तेथून पळ काढावा लागला. देहाने जरी गजानन पेंडसे शिल्लक नसला, तरी तो अजून ही त्या वास्तूचे रक्षण करत आहे अशी वदंता चहूकडे पसरली आणि त्या जागी कुणी फिरकेनास झालं.

काळ बदलला. वर्षा मागून वर्ष, अस करत शेकडो वर्ष उलटली. त्या वाड्याचे दगड उन – पावसात झिजत चालले. आता तर त्याच्या अवती भवती पुरुषभर उंचीच गवत आणि विशाल वृक्ष उभे राहिले. आणि तो वाडा जंगलाचाच एक भाग होऊन गेला. काही वर्षानी तर त्या जागी अशी एखादी वास्तू होती हे कुणाला सांगूनही खर वाटल नसत, इतका तो लुप्त झाला होता. कधी – कधी आसपासच्या गावातील मुल त्या बाजूलायायची आणि लगोरी खेळण्यासाठी फरशांचे तुकडे घेऊन जायची पण गजाननने त्यांना त्रास दिला नाही. 
————————————————————————
जवळच्या गावामधील लोकांकडून पिढ्यान – पिढ्या  कानी पडत आलेल्या वाड्याच्या संदर्भातील गोष्टी, प्रसंग दादासाहेबानी ऐकले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आल, की त्यांच्या पूर्वजांपैकी ज्याने-ज्याने त्या वास्तूतील अवशेषांना तोडून किंवा नामशेष करून त्या जागी वास्तू बांधायचा प्रयत्न केला, त्या सगळ्याना गजाननने सळो की पळो करून सोडले. आणि शिल्लक राहिलेले दगड हलवल्याशिवाय तिथे काहीही करण शक्य नसल्यामुळे इतके वर्ष तिथे काहीच बांधकाम झालं नाही. आता मात्र दादासाहेबामधील वास्तू रचनाकार जागा झाला. ते दगड आहेत त्याच स्थितीत ठेऊन त्यांच्या आजूबाजूला, जसा त्या काळी असेल, तसा वाडा बांधला तर ? नुसत्या कल्पनेनेच त्यांना झपाटून टाकल. त्याच दिवशी मुंबईस परत येऊन त्यांनी स्केचेस बनवायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात एक कच्चा आराखडा तयार झाला आणि त्यांनी बांधकामास सुरुवात केली. वाडा बांधत असताना सतत कुणी तरी आपल्याकडे रोखून बघत आहे असे भास तिथे काम करणा   मजुरांना होत असत पण दादासाहेबांनी त्यांना शांतपणे वाड्याच काम सुरु ठेवण्याची विनंती केली. आणि कोणतेही विघ्न न येता वाड्याची नवीन वास्तू बांधून पूर्ण झाली. तो वाडा जुन्या काळाच्या स्मृती जागविणारी एक भव्य वास्तू होती. 
————————————————————————

त्या दोन्ही गाडया साधारण एकाच वेगात जात होत्या. एका गाडीत दादासाहेब, त्यांची पत्नी गीतांजली उर्फ माई, मोठा मुलगा अरविंद, त्याची पत्नी करुणा आणि चौदा वर्षाची मुलगी स्नेहा तर दुस     गाडीत दादासाहेबांचा  धाकटा मुलगा भास्कर, त्याची पत्नी सुहासिनी आणि पाच वर्षाची काजल होती. अरविंदचा  मोठा मुलगा कुणाल ‘ मी माझ्या टू – व्हीलरवर येतो, तुम्ही पोचायच्या आत तिथे पोचतो की नाही बघाच ‘ असं म्हणत दोन्ही गाड्यांच्या पाच मिनिट नंतर निघाला होता. वयाची ऐशी वर्ष पार केलेले दादासाहेब आता थकले होते आणि ब       च वर्षापासून त्यांचे दोन्ही मुलगे व्यवसायाची धुरा पेलत होते. पण गेल्या काही वर्षात व्यवसायात वृद्धी होत नव्हती. सहसा फक्त दादासाहेब, माई आणि त्यांचा नातू कुणाल, असे तिघच त्या वास्तूत काही दिवस निवांत घालविण्याकरीता जात असत. पण आजची गोष्ट वेगळी होती. आज त्यांची दोन्ही मुल आपल्या बायका मुलांसह तिथे निघाले होते आणि त्याला कारणही तसच होत. सरकारी कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्यामुळे एका मोठ्या प्रोजेक्ट्च काम ठप्प झालं होत, शिवाय इतर कामांवर देखील त्याचा परिणाम झाल्यामुळे त्यांच्या कम्पनीला कोट्यवधीचा तोटा झाला होता. ह्या आर्थिक अरिष्टातून सुटण्यासाठी ती वास्तू विकून पैसा उभा करण्याचा विचार दोन्ही भावांच्या मनात होता.वाड्याच्या जवळच महामार्गाच काम सुरु झालं होत. शिवाय विमानतळ देखील होणार होता. त्यामुळे वाड्याची मोठी किंमत मिळेल असा त्यांचा अंदाज होता. दादासाहेबाचा त्याला अर्थातच विरोध होता आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवल. पण सुना देखील आपल्या नव     च्या री मध्ये री ओढत असल्यामुळे जे होतय ते उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हत. कुणालने देखील त्याच्या वडीलाना समजावून पाहिलं पण व्यर्थ. त्या परिसरातील मोठा बिल्डर मनसुख भाई किमती बद्दल चर्चा करायला वाडयावर येणार होता.

सकाळच्या कोवळ्या उन्हात तो वाडा एखाद्या दवबिंदू प्रमाणे चमकत होता. वाड्याची देखभाल करणारा कृष्णा पहाटेच उठला होता. आणि त्याच्या बरोबर सावली प्रमाणे असणारा शेरू कुत्रा खूपच खुशीत दिसत होता. जणू काही मुंबईहून येणा पाहुण्यांची खबर त्याला लागली होती.

” जरा आरशात तोंड बघ तुझ. काय सारखा मातीत लोळत असतोस. तुला कितीही स्वछ करा, तू घाणेरडा तो घाणेरडाच. अरे दादासाहेब काय म्हणतील तुला असा बघून ! की मी तुझ्याकडे लक्ष देत नाही ? थांब आता तुला आंघोळच घालतो थंड पाण्याने “. हे ऐकताच शेरू जो पळाला तो गायबच झाला.

————————————————————————

कुणालने इअर प्लग्ज सारखे केले आणि अक्सिलेटर वाढवला. थोड्या वेळापूर्वीच त्याने टाकी फूल केली होती. रस्त्यावर वर्दळ तशी कमीच होती. फार थोड्या जणांना माहित असलेल्या एका इंटर सेक्शन पाशी त्याने मोटर सायकल डाव्या बाजूस वळवली. हा रस्ता महामार्गाच्या तुलनेत थोडा कच्चा होता पण इथून तो वाडयावर लवकर पोहचत असे. ‘ अशी सुंदर वास्तू विकण्याचा विचार तरी कसा येतो ह्यांच्या मनात ? आणि स्वतःच्या आर्थिक अरिष्टातून मार्ग काढण्यासाठी वाड्याला का दावणीला बांधतायत हे ? ‘ कुणाल विचारात गढलेला असताना समोरून येणारा ट्रक त्याला दिसलाच नाही. शेवटच्या क्षणी बाईक हलकेच वळवून त्याने ब्रेक दाबला पण वेगात येणारा ट्रक त्याच्या पायाला घासत निघून गेला. ज्यामुळे त्याचा तोल जाऊन हंडल वरचे हात सुटले आणि शरीर हवेत उचलल गेलं. तो रस्त्याच्या कडेला फेकला गेला. जणू काही झालच नाही अशा थाटात ट्रक निघून गेला.

————————————————————————

काही दिवसांपूर्वी दादासाहेबांचा फोन आल्यापासूनच कृष्णा कामाला लागला होता. तेही साहजिक होत म्हणा. बारा खोल्या असलेला तो वाडा स्वच्छ करण म्हणजे एक कार्यक्रमच होता. सगळे दिवे, झुंबर, खांब,बैठका, गाद्या, चादरी, अभ्रे,फरशा  हे सगळ स्वछ करण्याच काम करायला कृष्णाला पूर्ण तीन दिवस लागले. तरी त्यातील ब    चशा खोल्या तो बंदच ठेवत असे, अगदी आत मध्ये असलेल्या फर्निचरवर व्यवस्थितपणे वर्तमानपत्रांचे कागद घालून. तरी देखील कुठून कोण जाणे, धूळ ही साचायचीच. प्यायचं पाणी भरून झाल्यावर कृष्णाने एकदा सभोवार नजर फिरवून काही राहील नाही ना, ह्याची खात्री करून घेतली. फोन हूकवर व्यवस्थित ठेऊन कृष्णाने त्याच्यावर एक हात फिरवला. हो,  कारण मुंबईहून निघताना दादासाहेब नेहेमी एक फोन करत असत, शिवाय इथे आल्यावर मोबाईलच नेटवर्क लागेलच ह्याची खात्री नसल्याने फोन फारच महत्वाचा होता. कृष्णाने शेरूला पकडून आणल आणि त्याच्या अंगावर दोन बादल्या पाणी ओतल. त्याच अंग साफ करत ‘ आता मातीत लोळलास तर याद राख ‘ अशी प्रेमळ ताकीद ही दिली. अर्थात थोड्या अंतरावर जाऊन तो मातीत लोळलाच ! कृष्णाने पटदिशी आंघोळ उरकून घेतली आणि देवपूजा केली. आता सर्व तयारी झाली होती, फक्त दारात रांगोळी काढली की झालं. 

————————————————————————

बेशुध्द कुणाल रस्त्याच्या कडेला पडला होता. त्याची जीन्स फाटली होती आणि जखमेतून रक्त देखील वहात होत. त्याचा सेल वाजला पण त्याच्या आईचा, करुणाचा आवाज त्याला ऐकू गेला नाही. तितक्यात दुर एक आकृती अवतरली. गोरा रंग, भरदार शरीर, दमदार चाल, अंगात धोतर, खांद्यावर उपरण, गळ्यात जानवं, कपाळाला उभं लाल गंध अशी ती व्यक्ती कुणाल जवळ आली. त्या व्यक्तीने कुणालचा फाटलेला पाय उपरण्याने बांधला आणि त्याला आपल्या खांद्यावर ठेवत विरुध्द दिशेने प्रयाण केलं.

————————————————————————

कृष्णा तुळशीला पाणी घालत होता तेव्हा त्याला दोन गाडया आत येताना दिसल्या. कुठून कोण जाणे पण शेरू देखील भुंकत – भुंकत आला. पटदिशी कृष्णा आत गेला आणि भाकर – तुकडा घेऊन आला. दोन्ही गाडया आत आल्या आणि एकेक करत सर्व जण खाली उतरले. कुणाल तिथे अगोदरच पोहचला असेल असं गृहीत धरून कुणीच काही बोललं नाही. पण त्याची टू व्हीलर दिसत नाही हे करुणाच्या लक्षात आल. ‘गेला असेल जवळच ‘ असा विचार तिने केला. वाड्याकडे बघताना प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. इतके वर्ष ज्या वास्तूला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं,  त्याचा सौदा करण आपल्या नशिबात आहे की काय, ह्या विचाराने दादासाहेबाना थोड भरून आल. अरविंद आणि भास्करला कधी एकदा ह्या वाड्याचा सौदा होतोय आणि आपण कर्जातून मुक्त होतोय असं झालं होत, तर खरच जर हा वाडा विकावा लागला तर ? ह्या विचाराने माईच्या डोळ्यात पाणी तरळल.  करुणा आणि सुहासिनी होत्या श्रीमंता घरच्या, त्यामुळे त्यांना पैसा प्रिय होताच. स्नेहा करीता हे एक आउटिंग होत तर छोटी काजल समजायला लागल्यापासून पहिल्यांदाच इथे येत होती. त्यामुळे तिच्या नजरेत एक भारलेपण होत. सुहासिनिचा हात धरून, डोळे मोठे करून ती सर्व दृश्य न्याहाळत होती. विशेषतः अंगणातील झोपाळा पाहून तर ती हरखलीच. मग अचानक तिच लक्ष शेरु कडे गेलं मात्र, तिने घाबरून आईला मिठी मारली. कृष्णाने सर्वांसाठी चहा बनवला.

” तू वाडा अगदी लक्ख ठेवला आहेस कृष्णा ! ” आराम खुर्चीत बसत दादासाहेब कौतुकाने म्हणाले.

” जी मालक… ” त्यांच्या पायाला हात लावत कृष्णा म्हणाला. ह्या वाडयाने त्याला सर्व काही दिल होत. आश्रय, प्रेम, सहचर्य …  

” कुणाल आल्या – आल्या बाहेर गेला वाटत ? ” करुणाने सहज विचारल.

” नाही तर. छोटे साहेब नाही आले अजून “.

” काय सांगतोयस ? अजून नाही पोहचला ? ” आता मात्र सगळेच काळजीत पडले.

करुणाने पुन्हा एकदा कुणालचा सेल ट्राय केला पण तो आउट आफ कव्हरेज दाखवत होता. थोड्या वेळाने मात्र बेल वाजली. पलीकडून एका स्त्रीचा आवाज आला. कुणालचा अक्सिडेट झाला होता पण आता तो शुद्धीवर आला होता. तो कोण होता ते त्याने सांगितल नाही पण एका माणसाने कुणालला हॉस्पिटल मध्ये पोहचवल होत. सर्वांच्या चेह     वर काळजी दाटून आली. कृष्णाने त्या अदृश्य रक्षणकर्त्याचे मनोमन आभार मानले. स्नेहा व काजलला कृष्णा सोबत ठेऊन सर्वानी हॉस्पिटलकडे धाव घेतली.

शेरूला कृष्णाने मागच्या अंगणात पिटाळल्यामुळे काजल थोडी खुलली होती. स्नेहाचा हात धरून ती झुंबर, मोठमोठाली शोभेची भांडी, भिंतीवरील चित्र पहात होती. तिला सगळ्यात जास्त काय आवडल असेल तर साधारण तिच्याच उंचीचा असलेला पितळी लामण दिवा. चवड्यावर उभं राहून ती त्याच निरीक्षण करत होती. एकेक दालन करत ते दोघ येऊन पोहचले मागच्या अंगणात. त्यांना पाहून शेरू आनंदाने भुंकू लागला.

” अरे माझ्या राजा, बांधून ठेवल का तुला ? चल तुला मोकळ करते ! ” असं स्नेहाने म्हणायचा अवकाश, काजलने मागच्या मागे धूम ठोकली आणि कृष्णाच्या आडोशाला लपली. निदान तिला तसं वाटल. कारण तो कृष्णा नव्हे तर गजानन होता. तिच्या केसात आणि गालावर हात फिरवत त्याने तिला शांत केल. हा कोण माणूस आहे असा प्रश्न तिला पडला. तेव्हढ्यात स्नेहा शेरूला घेऊन आत आली. तिने देखील त्याला पाहिलं. गजाननच्या शरीरा भोवती एक आभा पसरली होती आणि त्याच्या डोळ्यात वात्सल्य. त्याने शेरूला आपल्या जवळ बोलावल आणि त्याचा पंजा काजलच्या हातात दिला. शेरूने आनंदाने डोळे मिचकावले. पुढच्याच क्षणी गजानन अंतर्धान पावला. स्नेहाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण पाहिलं ते सत्य की स्वप्न ? कोण होता तो ? आणि असा अचानक कुठून आला ? आणि गायब कसा झाला ? ‘ दादांशी ह्या विषयावर बोलायला हव, एखाद वेळेस त्यांना माहित असेल ह्या बद्दल ‘, तिने विचार केला.

————————————————————————

दुस      दिवशी कुणालला डिस्चार्ज मिळाला. त्याच्या पायाला टाके पडले होते पण डोक वाचल्यामुळे थोडक्यात निभावल होत. जी व्यक्ती त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन आली होती, त्याच्या जुजबी वर्णना व्यतिरिक्त काहीच माहिती मिळाली नव्हती. सर्वानी त्या अज्ञात व्यक्तीचे आभार मानले. ह्या पलीकडे ते काय करू शकणार होते म्हणा…  

————————————————————————

” काय बोलायचय बेटा ? ” दादासाहेबानी विचारल.

” कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये  “. स्नेहा गोन्धळली होती.

दादासाहेब तिला निरखून पहात होते. त्यांनाही कळेना तिला काय विचारायचं आहे ते.

” परवा तुम्ही सगळे कुणालला घरी आणायला गेला होतात, तेव्हा आम्हाला… मला आणि काजलला एक माणूस दिसला, इथे, आपल्या घरात. तो अचानक कुठूनसा आला आणि गेला सुद्धा. उंच, गोरा होता तो … “. एका दमात तिने सगळ सांगितल.

” काय म्हणालीस ? उंच, गोरा ? इथे, आपल्या घरात ? पण हे कस शक्य आहे ? ” दादा साहेबांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हढ्यात कृष्णा आला.

” कृष्णा, स्नेहा काय म्हणत्ये ? ह्या घरात तिने एका अनोळखी माणसाला पाहिलं ? काय ऐकतोय मी हे ? दादासाहेबांचा पारा चढत होता…

” सांगतो दादासाहेब …..” कृष्णाने बोलायला सुरुवात केली.

————————————————————————

रात्रीचे अकरा वाजत आले होते. जेवण करून ते सगळे अंगणात बसले होते. चंद्र आकाश कंदिलासारखा प्रकाशमान झाला होता आणि त्याच्यावर असलेल सशाच चिन्ह अगदी ठळक दिसत होत. काजल त्या सुरेख प्रतिमेकडे निरखून बघत होती. दादासाहेबानी नुकत्याच शतपावल्या घातल्या होत्या आणि ते आराम खुर्चीत बसले होते. कृष्णा जवळच बसला होता आणि शेरू त्याच्या पायाशी पहुडला होता. दादांच्या दोन्ही सुना; करुणा आणि सुहासिनी विडे तयार करत होत्या.

” वाडा विकण्यासाठी तुम्ही राजी दिसत नाही ” दादासाहेबांकडे बघत अरविंद म्हणाला. ज्या गोष्टीची चर्चा ते इतके दिवस टाळत होते त्या विषयाला एकदाच तोंड फुटलं हे पाहून भास्करला आनंद झाला. माईना ते तितकस आवडल नाही कारण एक तर त्यांना इथे येऊन दोनच दिवस झाले होते, शिवाय कुणाल पुरता बरा झाला नव्हता.

” कोण राजी असेल ? एक तर आपल्या ही पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली जमीन आहे ज्यावर आपण वास्तू बांधली. आणि आता तर सरकार ह्या वाड्याला हेरीटेज वास्तू म्हणून घोषित करण्याचा विचार करीत आहे. इतक्या वर्षात तुमच्या पैकी कुणीच तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आता सुद्धा तुम्ही सगळे तिच्याकडे केवळ एक विकाऊ वस्तू ह्या नजरेने पहात आहात ही दुखा:ची गोष्ट आहे “. दादा साहेबाना आपल्या भावनांवर सयम ठेवता आला नाही.

” पण तुम्हीच सांगा, आजच्या काळात एखादी वास्तू अशी नुसतीच पडून असेल, तर त्याचा उपयोग तरी काय ? शिवाय व्यवसायातला तोटा भरून काढायला तिचा उपयोग होत असेल, तर कुणाची ना असेल त्याला ? “भास्करने स्पष्ट शब्दात आपल म्हणण मांडल. दादांच्या छातीत एक हलकी कळ उठली पण ते गप्प बसले. त्यांची चलबिचल माईनी ओळखली पण त्या काही बोलणार इतक्यात अरविंदने आपल बोलण पुढे सुरु ठेवल.

” दादा, ही वास्तू म्हणजे सोन्याची खाण आहे. तुम्हाला कल्पना नसेल,पण मनसुख भाई ह्या जागेसाठी पाच कोटी द्यायला तयार आहे. आमच बोलण झालेलं आहे “.

‘ पाच कोटी ! ‘ करुणा आणि सुहासिनी तो आकडा ऐकून हरखूनच गेल्या. एव्हढ्या पैशात काय – काय करता येईल ह्या विचाराने त्या आनंदल्या. आतापर्यंत माई मूक होत्या पण आपल्या सुनांच्या चेह      वरचे भाव बघून त्यानी बोलायचं ठरवल.

” मी दादासाहेबांशी सहमत आहे. लहान असताना ह्या वाड्याच्या अंगा – खांद्यावर तुम्ही वाढला आहात. अशा वास्तूकडे तुम्ही विकाऊ वस्तू म्हणून बघूच कस शकता ? केवळ तुमच्या गरजेपोटी ? शिवाय ही आपल्या पूर्वजांची निशाणी आहे. तिच रक्षण करायचं सोडून तुम्ही तिचाच घास घ्यायला निघाला आहात ? “

अरविंद आणि भास्कर तिच्या बोलण्याने थोडे हेलावले पण भावनांपेक्षा त्यांची गरज मोठी होती. माईच बोलण ऐकून दादासाहेबानी सुटकेचा निश्वास टाकला. कारण काही दिवसांपूर्वीच ‘ आता त्या दोघाना आर्थिक अडचण आहे तर विकू द्यावा त्यांना वाडा ‘ असा विचार माईनी बोलून दाखवला होता. हे बोलण सुरु असताना काही अंतरावर दारात उभ्या असलेल्या गजानन कडे कुणाचच लक्ष गेल नाही. माईकडे पाहून गजाननने नमस्कार केला. त्या एक क्षण घाबरल्या पण मग सावरल्या. कृष्णा, स्नेहा आणि काजलने त्याला पाहिलं होतच, आज इतरांनी देखील पाहिलं. सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले होते. वातावरणात एक भारलेपण आल होत. किंचित बाजूला होऊन गजाननने त्याच्या मागे असलेल्या एका पेटा      तील किमती वस्तू दाखवल्या. ज्यात होते अमुल्य जड – जवाहीर, रत्न, माणक, सोन्याचे अलंकार आणि बरच काही. हे सगळ स्वीकारण्यासाठी त्याचे डोळे आर्जव करीत होते. कुणीच जागच हलल नाही. कारण त्यांनी जे पाहिलं,ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडच होत. सगळ्यांकडे बघत गजानन हळू – हळू अंतर्धान पावला.

————————————————————————

आतल्या खोलीत कुणाल अर्धवट झोपेत होता. बाहेरचे आवाज त्याच्या कानावर पडत होते. केवळ पैशापायी आपले वडील आणि काका वाडा विकायचा विचार करत आहेत ह्याच त्याला दुख: झालं. आपणही त्यांच्या बोलण्यात सहभागी व्हावं आणि आपल मत मांडाव असं त्याला वाटल. पण त्याच्या अंगात बाहेर जाण्याच त्राण नव्हत. खिडकीतून येणा     थंड झुळुकेने त्याच अंग शहारल. पायाशी असलेल ब्लकेट ओढायचा त्याने प्रयत्न केला पण त्याचा हात तिथपर्यंत पोहचेना. त्याला जाणवल की आपल्या पायाशी कुणीतरी बसल आहे. गजाननने कुणालच्या अंगावर ब्लकेट घातल आणि आपला हात त्याच्या कपाळावर ठेवला. त्या स्पर्शाने त्याचे डोळे मिटले. त्याला गाढ झोप लागली.

————————————————————————

” आता मी तुम्हाला सांगतो तो कोण आहे… जेव्हा मला कृष्णाने सांगितल तेव्हा माझा देखील विश्वास बसत नव्हता. पण आता माझी खात्री पटली की तो आहे ह्या वास्तूचा रक्षक गजानन. माह्या वडिलांकडून मी लहान असताना त्याच्या बद्दल काही गोष्टी ऐकल्याच मलाही स्मरत आहे. ह्या वास्तुचच नव्हे तर त्यात राहणा     च देखील तो रक्षण करतो आहे. कुणालला त्यानेच वाचवल आणि आता देखील तुम्हाला आर्थिक अडचणीतून सोडवायला तोच धाऊन आला. आपण त्याचे आभार मानले पाहिजेत “. दादासाहेबांनी आपल बोलण संपवलं. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांच्या माना शरमेने खाली झुकल्या. त्यांना त्यांची चूक कळली होती.

————————————————————————

अरविंदचा फोन आल्यापासून मनसुखभाइच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला होता. त्याने दिलेली पाच कोटीची ऑफर दादासाहेबांच्या कुटुंबाने धुडकावल्यामुळे त्याची झोप उडाली होती. वाडा जमीनदोस्त केल्यावर जी हौसिंग कॉलनी तो बांधणार होता, त्या डील मध्ये मनसुखभाईचा बारा  कोटीचा फायदा होणार होता. निराशेपोटी आज त्याने दोन पेग जास्तीच घेतले. ज्याने आपल नुकसान केल, त्याला आयुष्यातून उठवायचच असा मनसुबा त्याने केला. आपल्या भाडोत्री गुंडाना फोन करून त्याने प्लन समजावून सांगितला. ‘ हा निर्णय तुम्हाला खूप महाग पडणार आहे दादासाहेब ‘ तो स्वतःशीच पुटपुटला. पिता – पिता बसल्या जागी कधी झोप लागली, तेच त्याला कळलं नाही. आणि अचानक धक्का बसावा तशी त्याला जाग आली.

पहिल्यांदा त्याला दिसल ते डोक, नंतर जणू काही भुवयामध्ये अडकल्या प्रमाणे दिसत असलेले डोळे. जमिनीतून एखादा अजगर वेटोळे करत वर यावा, तशी ती विचित्र आकृती हळू – हळू त्याच्या नजरे समोर आली. जे डोक त्याला दिसल, ते अनेक डोक्यांचा एक भाग होत, ज्याच्या मध्यभागी असलेल्या डोक्यालाच फक्त डोळे होते. एखाद्या राक्षसा सारखा उभा राहून तो आकार किळसवाणे फुत्कार सोडत होता. शेपटी जोरजोरात जमिनीवर आपटून आपल डोक मनसुख भाईच्या चेह       जवळ आणत त्याला घाबरवत होता. प्रत्येक फुत्कारानिशी त्याची कातडी फुलत होती ज्यातून दुर्गंधीयुक्त स्त्राव निघत होता. मनसुख भाईला किंचाळावस वाटत होत पण त्याची वाचा बंद झाली होती. त्याचा चेहरा आत्यंतिक भीतीने थिजला आणि तो गतप्राण झाला.  

                                                 ———————————