आपल्या आलीशान पेंट हाऊसमधल्या लाउंजमध्ये, लाउंज कसली; 
एखादा छोटेखानी समारंभ साजरा होऊ शकेल इतका मोठा हॉलच होता तो, 
कॉफीचे घोट घेत ती एकटीच बसली होती; लागोपाठ तीन शोंना 
कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे झालेला तोटा कसा भरून काढावा 

ह्या विचारात. तळपणारा सूर्य समोरच्या अवाढव्य राखाडी काचेतून मंद भासत होता. प्रेसने कव्हरेज तर छान दिलं होत, आपण पैसा ओततोच नेहेमी, पण स्पर्धा खूपच झाल्ये हल्ली. 

701151

जो उठतो तो फँशन शो करतो, इव्हेंट करतो. काय करावं म्हणजे हा तोटा भरून निघेल… 

—————————————————-
सरकारी कार्यालयात काम कमी आणि आवाज अधिक होतो. 
कागदांनी ओसंडून वाहणाऱ्या फायलींचे गठ्ठे, त्यावर पहुडलेली चिवट धूळ; 
धुळीच साम्राज्यच म्हणा आणि काही ना काही काम घेऊन आलेल्या 
लोकांची सतत ये-जा. किती जणांची कामं होतात आणि किती जणांची नाही, 
हा संशोधनाचा विषय. पेपरलेस व्हा असा संदेश देणार सरकार 
स्वत: मात्र कागदांच्या भेंडोळ्यात गुरफटलेल. कर्मचाऱ्याच्या 
टेबलवर कॉम्प्यूटर आणि त्याला चहुबाजुने वेढलेले पेपरांचे ढीग.      
 
एरवी सुस्त असणारी सरकारी कार्यालय निवडणुका जाहीर होण्याची 
दाट शक्यता असल्यामुळे आळस झटकून कामाला लागली होती. 
शक्य तितक्या लवकर फायली पूर्ण करून त्यावर सायबांच्या सह्या झाल्या, 
की आपली सोय झाली! शिवाय जाता-जाता जनतेची काही कामं 
आपसुक होत असली तर होऊ देत. म्हणा कोणतही सरकार 
निवडून आलं तरी आपल्याला काय फरक पडतो? आपलं काम 
आपण नित्यनेमाने सुरूच ठेवणार.      
—————————————————
‘तुम्ही फोन करताच सगळी कामं बाजूला टाकून आलो साहेब. 
बोला, काय हुकुम आहे?’ बसा म्हणण्याची 
वाट न बघता पडवळ खुर्चीत बसला देखील.
140702_lindau_meeting_2014_01  
 
‘मोठया सायबांची ऑर्डर आहे. ह्या वेळी 
१५ ऑगस्ट दणक्यात साजरा झाला पाहिजे’ 
 
‘दणक्यात’ ह्या एका शब्दानेच पडवळची कानशील तापली. 
वाफा यायला लागल्या म्हणा ना कानातून. च्यायला! 
म्हणजे मोठी ऑर्डर असणार. त्या नादात बाजूच्या खुर्चीवर 
एक माणूस अलगद येऊन बसलेला त्याला कळल सुद्धां नाही.
 
‘टेंडर आहे तुमचं माझ्याजवळ. बरीच आलीत…’
 
‘कुणाला बाजूला सारायचं आणि कुणाला तारायचं, हे तुमच्याच 
हातात आहे वाघचौरे साहेब…’ पडवळने नकळत हात जोडले.     
 
‘खर तर आम्हांला कुठे आवडत हे टेंडर-बिंडर. काय करणार, काढावच लागत’
 
 
‘गेल्या दोन वर्षांत सहा टेंडर भरली बघा, दोनदाच ऑर्डर मिळाली’
 
‘प्रत्येक वेळी तुम्हांला कसं मिळेल काम? पण तुम्ही नो टेन्शन घ्या, 
झेंड्याच टेंडर तुम्हांला मिळालं म्हणून समजा.
 
‘सरकारच्या अखत्यारीत येणारी सगळी कार्यालय, शाळा, झेड.  पी., संस्था, 
समित्या… झेंडे पोहचवावे देखील लागतील त्यांच्याकडे हां! 
आतां किती झेंडे किती लागतील ते पाहू. असं बघा, ४३३ म्युन्सिपाल्ट्या, 
३५ झेड. पी., ३५५ पंचायत समित्या कार्यालय, २८,८१३ ग्राम पंचायती, 
म्युन्सिपाल्टीच्या शाळा तर असंख्य; नक्की किती ते लवकरच कळेल. 
शिवाय अनेक संस्था, आश्रमशाळा. आपण फक्त झेंडे पुरवू. दोर आणि 
खांबाच त्यांच त्यांनी बघाव. आणि खांब उभे करायला खड्डेसुद्धां त्यांनीच खोदावे, काय?’  
 
 
‘म्हणजे एक लाखाच्या आसपास झेंडे लागतील’ आपल्याला 
लॉटरी लागली याची पडवळला खात्री पटली.  
   
‘तर! तेव्हढे तर कमीत-कमी. वाढीव ऑर्डरचं त्याच-त्या वेळी बघू. 
आणि हो! साहेबांनी अगदी निक्षून सांगितल आहे. कॉटनच्या 
शुभ्र पांढऱ्या कापडाचे हवेत झेंडे. आमचे साहेब म्हणजे ना… 
कापूस उद्योगाला सहाय्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत, 
हो! चार रंगी उत्तम छपाई हवी. फक्त एक अडचण आहे… ‘ 
 
‘अडचणींचे दिवस संपले साहेब, आतां छान दिवस येणार. 
तुम्ही फक्त हुकुम करा’
 
‘हे मोरे. साहेबांच्या जावयाचे मित्र. तुम्ही कोरे झेंडे पुरवायचे, 
रंगाची छपाई हे करतील’ छातीला हात लावत बाजूचा माणुस 
किंचित लवला, तेव्हां पडवळनी त्याला पाहिलं. त्याचा चेहरा 
आक्रसला कारण आतां पैशात वाटेकरी आला होता. 
आपला स्वत:चा प्रेस असूनही छापणार दुसराच.
 
‘सायबांचा माणूस म्हणजे… चालेल चालेल! मी शिवून ह्यांच्याकडे देतो झेंडे’  
——————————————————–
‘कुऱ्हाड कोसळणे’ ह्या वाक्प्रचाराचा प्रत्यय पडवळ, मोरे, 
वाघचौरे, त्यांचे साहेब आणि त्यांच्या वरचे साहेब; 
सगळ्यांना एकाच वेळी आला. सर्वात मोठे साहेब अर्थातच 
नामानिराळे राहणार होते, नुसते राहिलेच नाहीत, तर हात झटकून मोकळे झाले. 
अचानक हाय-कमांडकडून ऑर्डर आली, हा स्वातंत्र्यदिन 
साधेपणाने साजरा करा. खर्चाला आवर घाला. विरोधकांच्या हातात 
आयत कोलित देऊ नका. झेंड्यांची ऑर्डर संकटात सापडली. 
एक लाख झेंडे शिवून छापून तयार होते. पडवळ आणि मोरे; 
दोघांची झोप उडाली. पैसे तर बुडणारच, शिवाय लाखाच्यावर झेंडे 
साठवून त्यांच करायचं काय, हा प्रश्न.           
 
पडवळांना त्यांचा मृत देह झेंड्याच्या कापडात गुंडाळला आहे 
आणि मोरे त्यांच्या चितेला आग देत आहेत अशी स्वप्न 
पडू लागली. आणि बरीचशी माणसं आपल्या अंगावर पिचकारीतून 
तीन रंग उडवीत आहेत असे भास मोरेंना होऊ लागले.  

वाघचौरेंची तर झोपच उडाली. त्यांचा मेंदू कधी नव्हे तो वेगाने 
काम करू लागला. ह्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. 
शोधलं की सापडतच. वाघचौरेंना सापडलं. 
 
‘तुम्ही ते अशोक चक्र लपवून टाका पांढऱ्या कलरचा पच मारून. 
अजिबात दिसलं नाही पाहिजे. बाकी मी बघतो काय करायचं’. 
वाघचौरेंनी मोरेंना सांगितल.   
—————————————————-
तिचा सेल वाजला आणि वाघचौरेंच नांव पाहून तिच्या कपाळावर 
आठया पडल्या. हाच तो, जो ‘करू हो तुमच काम’ असं नुसत म्हणे, 
केलं एकदाही नाही. मोठया अनिच्छेने तिने ‘हलो’ म्हटल.
 
‘ड्राईव्ह करत होता कां ?’
 
‘नाही, बोला’.
 
‘तुमच्यासाठी एक काम काढलय. खूप दिवस मनात होत, 
काहीतरी करावं तुमच्यासाठी. उद्या येताय भेटायला?’
 
तिने होकार देताच त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. 
एका दगडात दोन पक्षी.  
 
नाही म्हणण शक्य नव्हत. झालेला तोटा भरून निघेल, 
अशी एक ही संधी तिला सोडता येत नव्हती. तिने नाही 
म्हणलेलं वाघचौरेंना परवडलं नसत. प्रसंगच तसा ओढवला होता.
—————————————————–
सतरा ऑगस्ट. पडवळ, मोरे, वाघचौरे, त्यांचे साहेब आणि ती; 
सगळे हास्य-विनोदात रमले होते; कां नाही रमणार? 
सगळ्यांच्या माना सुटल्या होत्या. पंधरा ऑगस्टच निमित्त साधून 
दिल्ली गेटला अतिभव्य फँशन शो झाला, 
ज्यात भारतीय झेंड्याचे रंग परिधान केलेली असंख्य लोक सामील झाली होती. 
झेंड्याने फास आवळलाच होता, सोडवला ही त्यानेच.
                           ———————