Marathi Poetry

1430444042

पाणी 

तो विषय त्यांचा
जे कट ग्लासमधे
उंची मद्य, सोडा व
थोडे पाणी टाकून
धरणांच्या कमतरतेविषयी
सतत बोलतात

तो विषय त्यांचा
जे झाडांना पाणी
घालताना
आखडता हात
आणि बिसलेरीसाठी
सढळ हाताने
खचॆ करतात

तो विषय त्यांचा
जे धबधब्याखाली
स्वच्छंद नाचून
पुन्हां शाॅवरखाली
आंघोळ करतात

दुष्काळात होरपळणार्यांना
मंगळावर पाणी आहे की नाही
हा विषय महत्वाचा
वाटत नाही.

                 —————————————-

काय राव !

अवघे तीन दिवस 

गुड मॉर्निंगचा मेसेज 

आला नाही म्हणून
 
मला काहीतरी 
झालं असावं 
असं समजून 
मित्र-मैत्रीणींची टोळधाड 
घरी आली
आणि मला दारांत बघताच
डोळे विस्फारत 
त्याच पावली परत गेली
च्यायला! 
म्हणजे whatsappवर 
दिसलो नाही तर 
खपलो असं समजतात ???? 
                      —————————————–