आज सकाळी प्रशांत उशिरा पर्यंत झोपून होता. आणि कसं कोण जाणे, त्याची पत्नी पल्लवी देखील. सकाळ झाली की तिला जाग येत असे पण प्रशांतने चहा बनवून तिला हाक मारायची असा दंडक होता जणू. आज मात्र दोघ जण रविवार असल्यासारखे झोपून होते. पल्लवीने डोळे उघडले आणि घड्याळ पाहिल.
‘ बाप रे नऊ ! प्रशांत उठ, वाजले किती बघ ”
” आज उशिरा जाईन म्हणतो …. ” दुस     दिवशी थोड उशिराने निघायचं असल तर सहसा तो तिला सांगत असे.
” काल बोलला नाहीस ते … बर जाऊ दे, आतां उठ आणि तयार हो ” म्हणत पल्लवी कामाला लागली. मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे दोघ झोपलेली होती.
——————————
————————–
तसं पाहता पस्तीस हे वय आळस करण्याच नव्हे पण हल्ली प्रशांतला ऑफिसला जायचा कंटाळा येत असे. गेल्या सहा महिन्या पासून पाच दिवसाचा आठवडा झाला होता तरी. त्याला कारणही तसच होत. मंदीची लाट आल्यामुळे ऑफिस मध्ये काम कमी झालं होत. खर्च जितका कमी करता येईल तितक बर, असा विचार करून 
कंपन्या पगार वाढ देण्याच टाळत होत्या. मुलं मोठी होत असल्यामुळे खर्च देखील वाढता होता. आवक आणि खर्चाचा मेळ घालताना त्याची आणि पल्लवीची दमछाक व्हायची. तिने नोकरी करावी म्हटल, तर मुलांकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न होता. तरी ती घर बसल्या कुठे शिवण काम कर, इमिटेशन ज्वेलरी वीक असं काही-बाही करत असे. तशातच एक दिवस हमखास फायदा मिळवुन देणा    व्यवसायाची कल्पना तिला सुचली. चिल्लरची वाढती गरज तिच्या पथ्थ्यावरच पडली.भिका    च्या कडून चिल्लर घेउन ती शंभर रुपया मागे दहा रूपये कमिशन ठेवून दूकान दारांना विकू लागली. सुरुवातीला तिला थोडी किळस वाटायची पण काही दिवसातच ती सरावली. अस्वच्छ नाणी साबणाच्या पाण्यात बुचक    न काढली की झाल. पैसे कमावण्यासाठी एव्हढे परिश्रम तर घ्यायलाच हवेत. 

प्रशांतचा स्वभाव देखील सतत व्यस्त राहण्याचा, त्यामुळे ऑफिस मध्ये दिवसभर नुसत बसून रहाण त्याच्या जीवावर येई. सन्ध्याकाळी एखादा पार्ट टाईम जॉब मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होता पण अजून तरी ते शक्य झालं नव्हत. आणि एक दिवस त्याला पार्ट टाईम जॉब मिळाला. दिवसभर ऑफिसला जाऊन प्रशांतला सन्ध्याकाळी पुन्हा काम कराव लागत ह्याच मंदाला वाईट वाटलं. पण त्याचा नाईलाज होता हे पल्लवीला कळत होत.
——————————
————————–
” काय रे, तब्ब्येत बरी आहे ना तुझी ? ” प्रशांतचे सीनियर विचारत होते.
” नाही तर ! मस्त आहे की… ”
” कसा दिसतोयस बघ 
जरा आरशात … ”
” नाही हो… पण हल्ली मला दाढी करायचा कंटाळाच येतो ” प्रशांत हसत म्हणाला.
” तुला … आणि एखाद्या गोष्टीचा 
कंटाळा ! बात कुछ जमी नहीं … ”
” हं… पण काय करणार, मला खरच 
कंटाळा येतो हल्ली… “
जेव्हा तोच प्रश्न 
पल्लवीने विचारला, तेव्हा मात्र त्याला काय बोलाव सुचेना. शिवाय गेल्या काही दिवसा पासून प्रशांत नेहेमी सारख जेवत नाही, हे सुद्धा तिच्या लक्षात आल होत. तस तिने त्याला विचारल देखील, पण हल्ली तितकी भूक लागत नाही, अस म्हणून प्रशांतने वेळ मारून नेली. 
——————————————————-
नुकतच बांधलेलं ते मंदिर शहरा पासून दूर अंतरावर होत. मुख्य शहरात मंदिराची संख्या उदंड होती. आणि भक्तांची सुद्धा. पण शहरा बाहेर असलेल्या त्या मंदिरात जवळच्या गावामधली माणसं सोडली तर विशेष कुणी जात नसे. खर तर जवळच वाहणारी नदी, पलीकडच्या बाजूस डोंगर रांगा, शीतल हवा, असं सुरेख वातावरण असलेल ते एकमेव मंदिर होत. त्या मंदिरा कडे लोकांचा ओघ कसा वळवता येईल, ह्या साठी आज मंदिराच्या विश्वस्तांची बैठक बोलविण्यात आली होती.

parvati-20hill-siddhesh-20nampurkar-wikipedia

” मला वाटत हे ठिकाण टुरीस्ट स्पॉट म्हणून घोषित व्हावं ह्या साठी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे आपोआपच लोकांचा ओघ इथे येईल ” नार्वेकर म्हणाले.
” म्हणजे राज्य शासनाला अर्ज देण आलं. तो कधी मंजूर होईल, सांगता यायचं नाही. शियाय टुरीस्ट स्पॉट म्हटल की इथे राहण्याची सोय हवी. निदान तात्पुरती. ती आपण कुठून करणार … “. देसाईनी शंका काढली.
” तुमच्या पैकी किती जणांना माहीत आहे कल्पना नाही, पण जिथे आतां सर्वाधिक भक्त येतात, ते श्री सिद्धी मंदिर देखील सुरुवातीला तितक लोकप्रिय नव्हत. जेव्हां तो सिने नट अमित खन्ना हॉस्पिटल मध्ये होता, तेव्हा त्याच्या पत्नीने साकड घातल होत म्हणे. सोन्याची कर्ण फूल काय दिली, मंदिरात बसून जप काय केला. तो नट बरा होऊन घरी परतला आणि त्या मंदिरात लोकांचा राबता वाढला “. पांढरे गुरुजीनी आपला विचार मांडला.
” अहो पांढरे गुरुजी, आपण कुणी प्रसिध्द व्यक्ती आजारी पडे पर्यंत वाट बघायची का? ” इंगळे म्हणाले.
” तसं नव्हे हो… पण आपल्या मंदिरात प्रसिध्द व्यक्ती आल्या की फरक पडेल असं मला वाटत… ” पांढरे गुरुजीनी मुद्दा धरून ठेवला.
” तुमच्या यजमानां पैकी कुणी प्रसिध्द व्यक्ती आहेत का ? ” नार्वेकरांनी विचारल.
” आहेत एक दोन. मी बघतो त्यांना इथे बोलवायचं “.
” आणखी एक. मी पाहिलय की मंदिराच्या बाहेर जितके जास्त भिकारी, तितकी त्या मंदिरात भक्तांची संख्या अधिक “. देसाई अभ्यासू माणूस. जग पाहिलेला.
” पण हे उलट सुद्धा असू शकेल. जितके भक्त जास्त, तितके भिकारी अधिक. आणि मंदिराच्या बाहेर भिकारी बसले तर मंदिराला त्याचा काय फायदा ? “
इंगळेनी विचारल.

” मी जसं म्हटल, तसं जर आपल्या मंदिराच्या बाहेर भिका   ची गर्दी झाली, तर नक्कीच हे मंदिर प्रसिध्द असणार असा समज पसरू शकतो “.
” एक तर सुट्ट्या पैशांची चणचण आहे, लोक भीक घालणार कुठून ? ”
” बस मध्ये कंडक्टरने सुट्टे पैसे मागितले तर लोक खळखळ करतात, कधी तर खिशात सुट्टे असून देखील नाहीत असं खोट सांगतात. पण भिका   ला मात्र निमुटपणे रुपया दोन रुपये अगदी सहज देतात “. देसाई आपल म्हणण पुढे रेटत म्हणाले.
” हे जरा अति होतय अस नाही का वाटत तुम्हाला ? ” नार्वेकराना राहवल नाही.
” मला वाटत आपल्याला सर्व पातळ्यांवर प्रयत्न करायला हवेत. कसं ही करून हे मंदिर लोकप्रिय झालच पाहिजे “. इतका वेळ गप्प असलेल्या घरतानी तोंड उघडल.

कसं ही करून म्हणजे नेमक काय, ते मात्र ठरल नाही. चर्चा तिथेच थांबली.

थोड्याच दिवसात त्या मंदिरात भाविकांची गर्दी होऊ लागली. हारा- फुलांची, उद्ब्त्याची दूकान, पेढे -बर्फीचे स्टॉल्स, चपला बुट सांभाळणारी, रांगा मध्ये शिस्त ठेवणारी माणस, इतकच काय तर तसच ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे मंदिराच्या तिजोरीत देखील भर पडू लागली. ते मन्दिर लोकप्रिय बनण्याकरिता विश्वस्तांनी केलेले प्रयत्न अखेर यशस्वी होऊ लागले होते.नार्वेकर, देसाई, पांढरे, इंगळे आणि घरत … मंदिराची कमाई वाढण्याकरीताविश्वस्त एक ही संधी सोडायला तयार नव्हते. त्यातही इंगळेनी लढवलेली शक्कल तर नामीच. प्रत्येक भिका   कडून दर दिवशी एक ठराविक रक्कम घेतली जाई, सणा वाराला थोडी अधिक. त्यांच म्हणण एकच. ‘ आपण त्याना पैसे कमावण्याची संधी देतोय, मग त्यातले थोडे त्यानी मंदिराला दिले तर काय बिघडल ? ‘ 
——————————————————-
त्या मंदिराची दखल वर्तमान पत्रानी सुद्धा घेतली. आणि तेच वाचून पल्लवी आज तिथे जायला निघाली होती. दर्शन तर तिला घ्यायच होतच पण इथे आलोच आहे, तर जमेल तितकी चिल्लर सुद्धा घ्यावी अस तिच्या मनात होत. पर्स मध्ये तीन हजार रूपये त्या साठीच तर घेतले होते तिने. ती जिथे रहात असे, त्याच्या आजुबाजुस असलेल्या मंदिराच्या बाहेरचे भिकारी तिला ओळखत. आणि ठरलेल्या दिवशी ती येणार हे माहीत असल्यामुळे ते सगळी चिल्लर व्यवस्थित मोजुन ठेवत. त्यामुळे तिचा वेळ मोडत नसे, शिवाय त्यांच्या गराड्यात बसाव सुद्धा लागत नसे. पण इथे ती प्रथमच येत होती. तरी तिने मंदिरात जाताना एक दोन जणाना चिल्लर मोजुन ठेवायला सांगितली. ते ऐकून इतर भिकारी सुद्धा आपापली चिल्लर मोजुन ठेवतील ह्याची तिला खात्री होती. आणि झाल ही तसच.

A-Bank-of-the-Beggars-by-the-Beggars-for-the-Beggars1-650x373

मंदिराच्या बाहेर येताच पल्लवी भवती त्यांचा गराडा पडला. जो-तो कागदात, कापडाच्या तुकड्यात बांधलेल्या चिल्लरच्या पुड्या तिच्या कडे द्यायला सरसावत होता. त्यात म्हातारी, तरणी, लहान मूल … सगळे होते. इतक्या जणाना पैसे देताना गोंधळ उडायला नको म्हणून तिने सगळ्याना आपापल्या पुड्या एका तरुण स्त्री कडे द्यायला सांगितल. आता तिच्या पर्स मध्ये जवळ पास अडीच हजाराची चिल्लर होती.
——————————————————–
पल्लवी घरी परते पर्यंत संध्याकाळ झाली. आता ती एकेक पुड़ी सोडवण्यात गुंतली होती. तोच तिच लक्ष एका जुन्या हात रुमालात बांधलेल्या नाण्याकडे गेल. तो प्रशांतचा रुमाल होता.
                                 —————————–